सामान्यांसाठी मोठी बातमी! दोन दिवसांत सोने 500 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त, पटापट तपासा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत 43000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कारण मागणीत घट कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोणतीही सकारात्मक बातमी नाही.

सामान्यांसाठी मोठी बातमी! दोन दिवसांत सोने 500 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त, पटापट तपासा
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 7:27 PM

नवी दिल्लीः सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव घसरत आहेत. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,141 रुपयांवर आलीय. त्याचबरोबर या काळात चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली. एक किलो चांदीची किंमत वाढून 59,429 रुपये झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत 43000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कारण मागणीत घट कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोणतीही सकारात्मक बातमी नाही.

सोन्याचे दर (Gold Rate 24 September 2021)

दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के सोने 365 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी किमती 45,506 रुपयांवरून 45,141 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,754 डॉलर प्रति औंस आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सध्या सोने 45,141 रुपयांवर आले आहे, म्हणजे गेल्या 1 वर्षात सोने 11,000 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाले.

चांदीची किंमत (Silver Price 24 September 2021)

चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ झालीय. दिल्ली सराफा बाजारात चांदी 21 रुपयांपर्यंत महाग झाली. चांदीची नवीन किंमत आता 59,429 रुपये प्रति किलो आहे. याच्या एक दिवस आधी ती 59,408 रुपये प्रति किलो होती. परदेशी बाजारात किंमत 22.68 डॉलर प्रति औंस आहे.

आता जगातील सर्वात मोठ्या फंडानेही सोने विकले

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, जगातील सर्वात मोठ्या ईटीएफ एसपीडीआर होल्डिंग्जने शुक्रवारी 8.1 टन सोने विकले आहे, जे या वर्षातील सर्वात मोठी एक दिवसाची विक्री आहे. एसपीडीआरचे एकूण सोने धारण 1,000.79 टनांवरून 992.65 टनांवर आले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एसपीडीआर होल्डिंग्जच्या विक्रीचा मुद्दा स्पष्ट आहे. सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. इक्विटी मार्केटच्या परताव्यामुळे सोन्याची उच्च पातळीवर विक्री होत आहे. येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आशा कमी आहे.

संबंधित बातम्या

New IT Rules: नवीन आयटी नियमांनुसार ट्विटरने नियुक्त केला कम्पलायन्स अधिकारी

नोकरदार 8 गोष्टींसाठी त्यांचे पीएफचे पैसे काढू शकतात, जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.