AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्सने 39 हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली आहे. आज सेन्सेक्सने 39 हजारांचा टप्पा पार केला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 185.97 अंकांच्या वाढीसह 38,858.88 वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 41.3 अंकांच्या वाढीसह 11,665.20 वर उघडला. आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व बँकेने व्याज दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह […]

शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्सने 39 हजारांचा टप्पा ओलांडला
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली आहे. आज सेन्सेक्सने 39 हजारांचा टप्पा पार केला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 185.97 अंकांच्या वाढीसह 38,858.88 वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 41.3 अंकांच्या वाढीसह 11,665.20 वर उघडला.

आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व बँकेने व्याज दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसत आहे. परदेशी गुंतवणुकीतील सकारात्मक संकेतांमुळे बाजाराला आधार मिळाला आहे. सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी 335 अंकांच्या उसळीसह सेन्सेक्सने 39,000 चा टप्पा पार केला. निफ्टीनेही जवळजवळ 11,700 चा टप्पा पार करत नवा विक्रम केला. दरम्यान,  9 ऑगस्ट 2018 ला सेन्सेक्स पहिल्यांदा 38,000 अंकांच्या पार गेला होता.

शेअर बाजारात मागील आठवड्यात व्यवसायांची स्थिती चांगली राहिली. त्यामुळे प्रमुख निर्देशांकात 1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सुरुवातीला टाटा मोटर्स, वेदांता लिमिटेड, टाटा स्टील, एलटी, आयसीआयसीआय बँक, एमअँडएम, भारती एअरटेल, एचसीएल टेक, इन्फोसिस, हिरो मोटो कॉर्प, एसवायएन, मारुती टीसीएस, आशियन पेंट, हिंदुस्तान यूनिलिवर, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, बजाज ऑटो आणि रिलायन्सच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. मात्र, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, येस बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक, एनटीपीसी, कोल इंडिया, ओएनजीसीचे शेअरची सुरुवात आदल्या दिवशीच्या तुलनेत कमी अंकावर सुरु झाले.

निफ्टीमध्ये टाटा मोटर्स, हिंडाल्को, वेदांता लिमिटेड, गेल, टाटा स्टीलचे शेअर ‘टॉप गेनर्स’ ठरले. दुसरीकडे आयओसी, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, ओएनजीसी, कोल इंडिया, जी लिमिटेडचे शेअर ‘टॉप लूजर्स’ ठरले.

पाहा व्हिडीओ:

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.