पेट्रोल डिझेलच्या जीएसटीमधील समावेशाबाबत केंद्राचा यू टर्न? पुढील 8 ते 10 वर्ष ‘हे’ शक्य नाही: सुशीलकुमार मोदी

भाजप खासदार सुशील मोदी यांनी राज्यसभेत बोलताना पुढील 8 ते 10 वर्ष पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणता येणार नाही, असं म्हटलंय. Sushil Modi petrol diesel GST

पेट्रोल डिझेलच्या जीएसटीमधील समावेशाबाबत केंद्राचा यू टर्न? पुढील 8 ते 10 वर्ष 'हे' शक्य नाही: सुशीलकुमार मोदी
सुशीलकुमार मोदी, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 2:05 PM

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत वित्त विधेयक 2021 वर चर्चा करताना पेट्रोल डिझेलच्या जीएसटीमधील समावेशाबद्दल घोषणा केली होती. राज्य सरकारानं प्रस्ताव आणल्यास जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, भाजप खासदार सुशील मोदी यांनी राज्यसभेत बोलताना पुढील 8 ते 10 वर्ष पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणता येणार नाही, असं म्हटलंय. (BJP MP Sushil Modi in Rajya Sabha said petrol diesel inclusion in GST not possible till next 8 to 10 years )

पेट्रोल आणि डिझेलवर 60 टक्के कर

राज्यसभेत सुशीलकुमार मोदी यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलवर 60 टक्के कर वसूल केला जात असल्याचं सांगितलं. 60 टक्क्यांमधील 35 टक्के केंद्र सरकार तर 25 टक्के कर राज्य सरकारकडून वसूल केला जातो. केंद्राच्या वाट्याच्या 35 टक्के करामधील 42 टक्के रक्कम राज्य सरकारनांना दिली जाते, असं सुशीलकुमार मोदी म्हणाले.

जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेल आणणार?

सुशीलकुमार मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री असताना जीएसटी परिषदेशी संबंधित राहिलेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची चर्चा होते तेव्हा ते संसदेत जाऊ इच्छितात. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास राज्यांना 2 लाख कोटी महसूलावर पाणी सोडावं लागेल. राज्य सरकार त्याची भरपाई कुठून करणार, असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी केला. भाजपची किंवा काँग्रेसची सत्ता असलेले राज्य सरकार महसूलावर पाणी सोडण्यास तयार नसल्याचं मोदी म्हणाले.

राज्यांच्या नुकसानाची भरपाई कशी करणार?

सुशीलकुमार मोदी यांनी जीएसटीमधील सर्वात मोठा कर 28 टक्के आहे. यामध्ये केंद्र सरकाराला 14 टक्के आणि राज्याला 14 टक्के मिळतात. यामुळे दोन ते अडीच लाख कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे, त्याची भरपाई कुठून केली जाणार आहे, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला. जर पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर केंद्राला जिथं 35 टक्के कर मिळतो तिथे त्यांना 14 टक्के कर मिळेल आणि राज्यांना 25 टक्के कर मिळतो तिथे 14 टक्के कर मिळेल.यामुळे पुढील 8 ते 10 वर्ष पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणणं शक्य नसल्याचं मोदी म्हणाले.

कॉर्पोरेट कर जगासारखा मग पेट्रोल डिझेल वर का नाही?

वित्त विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार दीपिंदर सिंह हुड्डा यांनी जर सरकार कॉर्पोरेट कर जगात असलेल्या टक्केवारी प्रमाण असावं, असं म्हणते तर पेट्रोल आणि डिझेलवरील कर जगात असणाऱ्या कराप्रमाणं का नसावा?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार, मोदी सरकारचे मोठे संकेत

पेट्रोल आणि डिझेल लवकरच स्वस्त होणारच; तेलाचे दर उतरणार, हे आहे ‘कारण’

(BJP MP Sushil Modi in Rajya Sabha said petrol diesel inclusion in GST not possible till next 8 to 10 years )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.