AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर ‘बोली’चा पैसा थेट शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये येणार !

बीएसईने कृषी उत्पादनं विक्रीसाठी एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्म (Electronic Spot Platform) आणला आहे.

तर 'बोली'चा पैसा थेट शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये येणार !
7th Pay Commission : देशातील तब्बल 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारक हे जुलै ते डिसेंबर 2020 मधील महागाई भत्ता आणि त्यातील 4 टक्के वाढीची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशात माध्यमांमधून हाती आलेल्या माहितीनुसार, जानेवारी-जून 2021 मध्ये 4 टक्के DA भाडं होळीआधी देण्याच्या तयारीत सरकार असल्याचं सांगण्यात येत आहे. (good news 7th Pay Commission DA may increase before Holi travel allowance likely to increase by 8 percent)
| Updated on: Dec 13, 2020 | 10:43 AM
Share

मुंबई : देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE Limited) ने शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लॉंच केला आहे.  बीएसईने कृषी उत्पादनांसाठी (Agricultural Commodities) एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्म (Electronic Spot Platform) आणला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव BSE e-Agricultural Markets Ltd (BEAM)हे आहे.  शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी BEAM राष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्मच्या रुपात काम करेल. या ठिकाणी शेतकरी त्यांची उत्पादनं इलेक्रट्रॉनिक माध्यमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी ठेवतील. इथं शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन पद्धतीनं विक्री केली जाईल, यामुळं विक्रीसाठी बोली लागलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. (BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)

BEAM शेतकरी, व्यापारी आणि इतर संबंधित घटकांना शेतमाल खरेदी विक्रीतील इतर अडचणींपासून मुक्त करेल. एक्सचेंजच्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म मध्यस्थासारखं काम करेल. कमी खर्च, उच्च खरेदी क्षमता यासह उत्पादकांना योग्य लाभ आणि एकाहून अधिक ग्राहकांमध्ये उत्पादनाचे दर निश्चित करेल. BEAM ही व्यवस्था उत्पादनांची खरेदी आणि व्यापार यात येणाऱ्या अडचणींना देखील दूर करेल, अशी माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं दिली आहे. (BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)

शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

BSE चे एमडी आशीष कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसई राष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या वितरणासाठी नेटवर्क तयार करत आहे. या नेटवर्कद्वारे वस्तूंची खरेदी पारदर्शक पद्धतीनं केली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेद्वारे खरेदी केलेल्या मालाची रक्कम थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा?

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आणलेल्या नव्या BEAM व्यवस्थेद्वारे शेतकरी एका राज्यांतून दुसऱ्या राज्यातील बाजारांमध्ये पोहोचतील आणि त्यांना मालाची विक्री करता येईल. बीएसईने दिलेल्या माहितीनुसार या प्रणालीचा फायदा फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या गटांना त्याच्या सर्वोत्तम दर्जाचे धान्य विक्रीतून चांगल्या प्रकारचा दर मिळेल. राज्यांकडून माल खरेदी करणाऱ्या मध्यस्थ, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदार यांनाही त्याचा फायदा होणार आहे. (BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)

11 डिसेंबर पासून सुरुवात

BEAM या प्लॅटफॉर्मची सुरुवात 11 डिसेंबरपासून झाली आहे. सध्या हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक स्वरुपात चालवला जात आहे. बीएसईने दिलेल्या माहितीनुसार हा प्लॅटफॉर्म राष्ट्रीय स्तरावर काम करेल. या प्लॅटफॉर्मची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक देश एक मार्केट या संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या: 

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

(BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.