AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांसाठी बंपर गिफ्ट, दोन वर्षे सरकार भरणार पीएफचे पैसे

या योजनेंतर्गत, जर एखाद्या संस्थेत 1000 हून अधिक लोक काम करत असतील तर सरकार कर्मचार्‍यांचा फक्त 12 टक्के हिस्सा पीएफ फंडात जमा करेल. (Bumper gift for those earning up to 15000, know who will benefit from the government coffers)

नोकरदारांसाठी बंपर गिफ्ट, दोन वर्षे सरकार भरणार पीएफचे पैसे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
| Updated on: Jun 28, 2021 | 6:06 PM
Share

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत, ज्यांचे वेतन 15 हजारांपेक्षा कमी असेल त्यांना भविष्य निर्वाह निधीतील कर्मचारी आणि कंपनीचा हिस्सा 2 वर्षे सरकार जमा करणार आहे. सरकारला अपेक्षा आहे की, 58.50 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत, जर एखाद्या संस्थेत 1000 हून अधिक लोक काम करत असतील तर सरकार कर्मचार्‍यांचा फक्त 12 टक्के हिस्सा पीएफ फंडात जमा करेल. या योजनेंतर्गत आतापर्यंत 21.42 लाख कर्मचाऱ्यांना 902 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. (Bumper gift for those earning up to 15000, know who will benefit from the government)

सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 ला सुरू केली गेली. ही योजना आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वी याची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत होती. या योजनेसाठी सरकारचे बजेट 22810 कोटी रुपये होते.

कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी गॅरंटी स्किम

कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी 50 हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी 60 हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल, असेही सितारमण यांनी पुढे नमूद केले.

एका घटकाला जास्तीत जास्त 100 कोटी कर्ज

आरोग्य सेवा क्षेत्रात हमी योजनेंतर्गत कर्जाचे वितरण 7.95 टक्के दराने करण्यात येईल. कोणत्याही एका घटकाला जास्तीत जास्त 100 कोटी कर्ज देण्यात येईल. हमी कालावधी 3 वर्षांचा असेल. इतर क्षेत्रांना 8.25 टक्के दराने कर्ज मिळेल. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आज आठ सुधार उपायांची घोषणा केली जाईल, त्यातील चार पूर्णपणे नवीन आहेत. त्याशिवाय अतिरिक्त आपत्कालीन क्रेडिट लाइनची 1.5 लाख कोटींची हमी योजना जाहीर करण्यात आली आहे.

नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शकांसाठी नवीन योजना

कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. पर्यटन क्षेत्र सांभाळण्यासाठी 11,000 नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत एजन्सीला 10 लाखांपर्यंतचे हमी कर्ज मिळेल. नोंदणीकृत मार्गदर्शकास 1 लाखांपर्यंत 100% हमी कर्ज मिळू शकते. यासाठी कोणत्याही कोलॅट्रलची आवश्यकता नाही.

परदेशी पर्यंटकांना मोफत पर्यटक व्हिसा

पर्यटनाला मदत करण्यासाठी आणखी एक घोषणा करण्यात आली आहे. प्रथम 5 लाख परदेशी पर्यटकांना मोफत पर्यटक व्हिसाचा लाभ मिळेल. 2019 मध्ये एकूण 10.93 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. या लोकांनी मिळून 30 अब्ज डॉलर्स खर्च केले. त्यांचा भारतात 21 दिवस मुक्काम असतो. एका पर्यटकास विनामूल्य व्हिसाचा लाभ एकदाच मिळेल. ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत राहील. यामुळे सरकारी तिजोरीवर 100 कोटींचा बोजा वाढेल. (Bumper gift for those earning up to 15000, know who will benefit from the government)

इतर बातम्या

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

‘मग नक्कीच हा वाघ सर्कशीतला असावा’, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेला पुन्हा टोला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.