Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेला पोर्तुगालचा संघ बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात 1-0 ने पराभूत झाला. ज्यामुळे यंदाच्या युरो स्पर्धेतील पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले असून रोनाल्डोचे विजयाचे स्वप्नही भंगले आहे.

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक
ronaldo lost euro

सेविले: युरो चषक 2020 (Euro Cup 2020) मध्ये रविवारी झालेल्या पोर्तुगाल (Portugal) विरुद्ध बेल्जिय (Belgium) सामन्यात पोर्तुगालचा अवघ्या 1-0 च्या फरकाने पराभव झाला ज्यामुळे जगातील अव्वल दर्जाचा आणि सर्वांत प्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) यंदाच्या युरो चषकातील प्रवासही संपला. रोनाल्डो पराभवानंतर मैदानावर भावूक झाला विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील महत्त्वाचे खेळाडूही भावूक झाले. बेल्जियमचा स्टार खेळाडू रोमेलो लुकाकूने (Romelu Lukaku) रोनाल्डोला मिठी मारत त्याचे सांत्वन देखील केले. लूकाकुच्या या कृतीबद्दल अनेकांनी त्याचे कौतुक केले. (Portugal captain Cristiano Ronaldo Gets Emotional After Belgium defeated them in EURO 2020)

‘बॉलला आज गोलपोस्टमध्ये जायचेच नव्हते’

भावूक रोनाल्डोने सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा गोलकिपर थाबाउट कोर्टिसच्या (Thibaut Courtois) कानात काहीतरी पुटपुटला ज्याचा व्हिडीओ जगभरात तुफान व्हायरल होत आहे. ‘आज तुमचा नशिब चांगला होतं, बॉलला आज गोलपोस्टमध्ये जायचेच नव्हते, पुढील प्रवासासाठी शुभेच्छा’ हे शब्द भावूक रोनाल्डोने प्रतिस्पर्धी गोलकिपरच्या कानात म्हटले. हे म्हणताना रोनाल्डोचा चेहरा अत्यंत भावूक झाल्याचे दिसून येते. त्यावरुनच त्याला झालेल्या दुखाचा ही अंदाच लावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे सामन्यात पोर्तुगालने तब्बल 23 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र गोल होऊ शकला नाही.

रोनाल्डोची एकाकी झुंज

रोनाल्डोला जगातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू म्हटलं जात. त्यामुळे अर्थातच पोर्तुगाल संघाती सर्वात बेस्ट खेळाडू तोच आहे. यंदा देखील युरो चषकात रोनाल्डोने पहिल्या सामन्यापासून संघासाठी एकाकी झुंज दिली. त्याने यंदाच्या स्पर्धेत 5 गोल केले. जे सध्या स्पर्धेतील सर्वाधिक गोल आहेत. अखेरच्या सामन्यातही रोनाल्ड़ोने अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न केला तसेच सोबती खेळाडूंना अनेकदा असिस्ट करुन गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र यश न मिळाल्याने अखेर 1-0 च्या फरकाने पोर्तुगालला पराभव पत्करावा लागला. सामन्यात बेल्जियमच्या टी हजार्ड याने 42 व्य़ा मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला.

 हे ही वाचा :

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

(Portugal captain Cristiano Ronaldo Gets Emotional After Belgium defeated them in EURO 2020)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI