AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मातीशिवाय घरीच पिकवा भाज्या, कमी जागेत लाखोंनी कमावाल!

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी जागेत जास्त पैसे कमवण्याचा हा एक उत्तम पर्याय झाला आहे.

आता मातीशिवाय घरीच पिकवा भाज्या, कमी जागेत लाखोंनी कमावाल!
| Edited By: | Updated on: Jan 14, 2021 | 10:53 PM
Share

मुंबई : सध्या लोकसंख्या वेगाने वाढत आहे तर शेती व्यवसाय कुठेतरी कमी होताना दिसत आहे. अशात भविष्यासाठी लोक आता नव्या पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी जागेत जास्त पैसे कमवण्याचा हा एक उत्तम पर्याय झाला आहे. सध्या अनेक जण मातीशिवाय शेती (Soilless farming) करण्यासाठी पुढे येत आहेत. आता तुम्ही म्हणाल मातीशिवाय शेती कशी होणार? पण हे खरं आहे. कृषी शास्त्रज्ञांनी असं करून दाखवलं आहे. (business idea you can do soilless farming a farming without soil know about vegetables indo israel)

इंडो-इस्त्राईल सेंटर फॉर एक्सलन्स (Indo-Israel Center for Excellence) यासंबंधी अनेक प्रयोग केले आहेत. काही शेतकर्‍यांनीही याची लागवड केली आहे. त्यातून हा शेतीचा आणि नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय असल्याचं समोर आलं आहे. खरंतर, आपण शहरात राहून बाजारात मिळणाऱ्या अनेक केमिकल भाज्या खातो. पण अशात तुमच्या टेरेस आणि बालकनीमध्ये तुम्ही उत्तम शेती करू शकता. ज्यामध्ये जास्त खत किंवा कीटकनाशक नसतील.

जर तुम्ही खेड्यात राहुन शेती करत असाल तर तुमच्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने शेती करून तुम्ही कोट्यावधी रुपये कमवू शकता. यासाठी तुम्ही पॉली हाऊस बांधलं तर आणखीनच चांगली बाब आहे.

माती नसेल तर कशी होणार शेती?

मातीशिवाय शेती करण्यासाठी आयएआरआयमध्ये अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी डॉ. नीलम पटेल यांनी टीव्ही -9 डिजिटलला सविस्तर माहिती दिली आहे. हे मॉडेल जरी इंडो इस्त्राईल सेंटर फॉर एक्सलन्समध्ये असलं तरी ही भारतीय पद्धत आहे.

– या शेतीसाठी मातीच्या जागी कोकोपीट (नारळ पावडर), गांडूळ आणि पेरलाइट वापरतात.

– मातीमुळे वनस्पतींना जे रोग येतात ते या पद्धतीमुळे येत नाहीत.

– या पद्धतीच्या शेतीसाठी फार कमी पाणी लागतं. यामध्ये दुसरं खत म्हणून सेंद्रिय किंवा इतर खत वापरलं जातं

– याला व्हरटिकल शेती (vertical farming) असंही म्हणतात. कारण, ही कमी जागेत केली जाते. आणि यातून जास्त नफा होतो.

कशी आहे या शेतीची रचना?

– या पद्धतीने शेती करण्यासाठी तुम्ही भांड्यात, पॉलिथीनमध्ये किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये बियाणे ठेवू शकता. ते मोठे होतील

– यासाठी अनेक बनवलेली भांडी आणि कंटेनरही बाजारात मिळतात.

– कोकोपीट 19-20 रुपये किलोने मिळतं. तर गांडूळ आणि पेरलाइट एक किलो 80-90 रुपयांना उपलब्ध आहेत.

Soilless-farming

– तीन भाग कोकोपीट आणि दोन भाग गांडूळ आणि पेरलाइट असं मिश्रण करायचं. कोकोपीटच्या तीन बादल्यांवर व्हर्मीक्युलाइट आणि पेरलाइटच्या दोन बादल्या मिसळायच्या आणि नंतर धान्य पेरायचं. (business idea you can do soilless farming a farming without soil know about vegetables indo israel)

संबंधित बातम्या – 

बचत खात्यात महिन्याला जमा करा फक्त 1 रुपया, 2 लाखांचा होईल फायदा

क्रेडिट आणि डेबिट कार्डवर मोफत मिळतात ‘या’ सेवा, आताच जाणून घ्या

(business idea you can do soilless farming a farming without soil know about vegetables indo israel)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.