AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF खात्यातून मिळते कर्ज? EPFO चा नियम सांगतो काय? क्लेम करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

EPFO PF Account Loan : खासगी कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ हा चांगला आधार आहे. दरमहा एक ठराविक रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. त्यावर सरकारकडून व्याजही देण्यात येते. मग ईपीएफओ रक्कमेवर कर्ज घेता येते का?

PF खात्यातून मिळते कर्ज? EPFO चा नियम सांगतो काय? क्लेम करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या
ईपीएफओ पीएफ खाते
| Updated on: Sep 15, 2026 | 2:36 PM
Share

खासगी कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ हा भविष्यासाठी चांगला आधार मानल्या जातो. उतारवयात एक ठराविक रक्कम पीएफ म्हणून मिळते. कर्मचीर भविष्य निर्वाह निधी खात्यात अर्थात ईपीएफ खात्यात कंपनी आणि कर्मचाऱ्याचे योगदान जमा होते. त्यावर सरकारकडून व्याजही जमा होते. पीएफची रक्कम अनेकदा घर, शिक्षण, आरोग्य वा इतर कारणासाठी काढता येते. आता रक्कम काढण्यासाठी सुविधाही वाढल्या आहेत. गरजेच्या वेळी 75 टक्के रक्कम पीएफ खात्यातून काढता येते. ऑनलाईन प्रक्रियेमुळे आता पीएफ रक्कम काढणे सोपे झाले आहे. बँकेप्रमाणे ईपीएफओकडून पीएफ खात्यावर वैयक्तिक कर्ज घेता येते का?

ईपीएफओ कर्ज देत नाही

तर ईपीएफओ ही सरकारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन करणारी संस्था आहे. ती बँकेसारखी सुविधा देत नाही. त्यामुळे पीएफ रक्कमेवर ती कर्ज देत नाही. तर कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येते. ही रक्कम परत खात्यात जमा करता येत नाही. जी रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा असते त्यावर व्याज सुरू असते. अद्याप ईपीएफओने कर्जाचा अथवा ईएमआयद्वारे कर्ज परतफेडीचा कोणताही पर्याय अद्याप समोर आणलेला नाही.

ईपीएफओ सदस्यांना लवकरच एटीएम कार्ड

EPFO 3.0 अंतर्गत सदस्यांना ATM Card देण्यात येणार आहे. त्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईट आणि सिस्टिममध्ये सुधारणा सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही सुविधा दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा सदस्यांना मिळेल. कर्मचाऱ्यांना वेळेवर त्यांच्या गरजेनुसार, पैसे काढता येतील. त्यांना खात्याची अपडेट कळेल. निवृत्ती फंडसंदर्भात पेन्शनधारकांना अधिक सुविधा देण्यात येतील.

आगामी काळात PF खाते आधुनिक बँकिंग सिस्टिमसारखे काम करेल. हे पीएफ खाते UPI नेटवर्कशी जोडल्या जाईल. यामुळे छोट्या अत्यावश्यक रक्कमेची गरज पडेल, तेव्हा कर्मचाऱ्यांना थेट ATM आणि UPI च्या माध्यमातून एक निश्चित रक्कम काढता येईल. EPFO ने त्यांची बहुप्रतिक्षित UPI-Linked Claim Settlement सुविधा सध्या पुढे ढकलली आहे. पण ही योजना बारगळली नाही, ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

EPFO E-PRAAPTI पोर्टल आहे काय?

‘EPF Aadhaar-Based Access Portal for Tracking Inoperative Accounts’ म्हणजे ई-प्राप्ती आहे. जुन्या आणि निष्क्रिय पीएफ खाती शोधण्यासाठी विसरभोळ्या कर्मचाऱ्यांना या पोर्टलचा वापर करता येईल. हे पोर्टल विशेष करून जुनी खाती आणि बंद पडलेली खाती पुन्हा सक्रिय करण्यात मोलाची भर घालेल. ज्यांची खाती सध्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी (UAN) लिंक नाहीत, त्यांना पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. जुन्या आणि निष्क्रिय पीएफ खात्यातील अडकलेली 9,330 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

Follow Us
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...