लग्नासाठी रोल्स रॉयस भाड्याने हवीय? एवढ्या लाखांत मिळते ही लक्झरी कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
रोल्स रॉयस ही कार विकत घेणं अनेकांसाठी केवळ स्वप्नच राहतं. मात्र, आता हे स्वप्न भाड्याच्या पर्यायामुळे सामान्य लोकांसाठीही साकार होऊ लागलं आहे. लाखो रुपये किंमतीच्या या लक्झरी कारमध्ये बसून शाही प्रवासाचा आनंद घेण्याची संधी सर्वसामान्यांनाही मिळू शकते.

रोल्स रॉयस कारमध्ये प्रवास करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. ही कार केवळ लक्झरी नाही तर श्रीमंती आणि प्रतिष्ठेचंही प्रतीक मानली जाते. मात्र, याच्या प्रचंड किमतीमुळे सर्वसामान्य माणसाला ती खरेदी करणं शक्य होत नाही. परंतु, आता ही कार भाड्याने घेऊन देखील अनेक जण आपलं हे स्वप्न पूर्ण करत आहेत.
रोल्स रॉयसचा इतिहास
ब्रिटीश कार निर्माता कंपनी रोल्स रॉयसची स्थापना 1904 मध्ये झाली. जगभरात या कारचा दबदबा आहे आणि अनेक श्रीमंतांच्या गॅरेजमध्ये ही कार स्थानापन्न झाली आहे. भारतात रोल्स रॉयसचा प्रवास 1920 च्या दशकात सुरू झाला. 1921 मध्ये कंपनीने आपली पहिली कार “रोल्स रॉयस 40/50 एचपी” लाँच केली होती.
आजच्या घडीला भारतात विविध प्रमुख शहरांमध्ये रोल्स रॉयसच्या लक्झरी कार्स सहज पाहायला मिळतात. सध्या भारतात एसयूव्ही, दोन सेडान आणि एक कूप प्रकारातील रोल्स रॉयस कार्स उपलब्ध आहेत. यामध्ये भारतातील सर्वात स्वस्त मॉडेल “कुलिनन” आहे, तरीसुद्धा त्याची किंमत देखील कोट्यवधी रुपयांत आहे.
भाड्याने रोल्स रॉयस घेण्याचा नवा ट्रेंड
ज्यांना कार खरेदी करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही कार भाड्याने घेण्याचा पर्याय उत्तम ठरत आहे. विशेषतः लग्नाच्या हंगामात या कारला मोठी मागणी असते. लग्नात दुल्हा-दुल्हनच्या आलिशान आगमनासाठी रोल्स रॉयस ही पहिली पसंती ठरते. त्यामुळे लग्नाच्या तयारीमध्ये आता या कारचा समावेश होताना दिसतो.
या कारचं भाडं देखील सामान्य माणसाला चक्रावून टाकणारं आहे. 8 तासांसाठी रोल्स रॉयसचं भाडं तब्बल 2.99 लाख रुपये इतकं आहे. काही वेबसाइट्सवर, जसे की इंडियामार्ट, याठिकाणी देखील ही कार भाड्याने मिळते आणि तेथे भाडं 79,999 रुपये इतकं आहे. मात्र, हे दर शहरानुसार बदलतात. दिल्लीत ‘सेफ रेंट ए कार’ सारख्या एजन्सीकडून या कार्स भाड्याने घेतल्या जातात.
या कारमध्ये बसणे हे केवळ प्रवास नसतो, तर एक शाही अनुभव असतो. त्यामुळे अनेकजण आयुष्यात एकदा तरी या कारमध्ये बसण्याचं स्वप्न पाहतात. भाड्याच्या माध्यमातून हे स्वप्न आता सहज पूर्ण करता येत आहे.
सतत वाढणारी लोकप्रियता
रोल्स रॉयसच्या भाड्याच्या सेवांना सध्या भारतात हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष कार्यक्रम, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हीआयपी फंक्शन्स आणि लग्न समारंभ यासाठी या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात ही मागणी अजून अधिक वाढण्याची शक्यता आहे.
