कार लोन घेण्यापूर्वी 20/4/10 फॉर्म्युला वापरा, नुकसान टळेल
बँकेकडून कार लोन घेतल्यास तुम्हाला कमी पैशात कार मिळेल, पण तुम्हाला दर महिन्याला बँकेला EMI भरावा लागेल. अशावेळी कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्हाला कार लोन घ्यायचे आहे क? मग चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याविषयीची सविस्तर माहिती देणार आहोत. कार लोन घेताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न किती आहे, किती डाउन पेमेंट करावे, या गोष्टी देखील कार लोन घेताना आवश्यक आहे. तसेच आज आम्ही तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती देणार आहोत. हा फॉर्म्युला तुम्ही वापरल्यास तुमच्या डोक्यावर कर्जाचा बोजा देखील वाढणार नाही. जाणून घेऊया.
जवळपास प्रत्येक व्यक्तीचं स्वत:ची कार विकत घेण्याचं स्वप्न असतं, पण कारच्या किमती पाहता प्रत्येक व्यक्ती कार खरेदी करू शकत नाही. मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी कार खरेदी करणे ही मोठी गोष्ट असते. कार खरेदी करण्यासाठी अनेकजण बँकेकडून कार लोनही घेतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही कार खरेदी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही बँकेकडून कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
बँकेकडून कार लोन घेतल्यास तुम्हाला कमी पैशात कार मिळेल, पण तुम्हाला दर महिन्याला बँकेला ईएमआय भरावा लागेल. प्रत्येक महिन्याचा ईएमआय तुमच्या आर्थिक अडचणीत भर घालू शकतो. अशावेळी कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.
कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.
कार लोनपूर्वी ‘हे’ सूत्र समजून घ्या
20/4/2010 फॉर्म्युल्यानुसार कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला तीन गोष्टी माहित असणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये कार लोनचा ईएमआय, कार लोनचा कालावधी आणि कार लोनच्या डाउन पेमेंटचा समावेश आहे.
20/4/10 फॉर्म्युल्यात 20 म्हणजे 20 टक्के डाउन पेमेंट. कार लोन घेताना 20 टक्के डाउन पेमेंट करावे लागते.
20/4/10 फॉर्म्युल्यात 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी. म्हणजेच कार लोनचा कालावधी 4 वर्षांपेक्षा जास्त वाढवू नये.
20/4/10 फॉर्म्युल्यात 10 म्हणजे तुमच्या पगाराच्या 10 टक्के. तुमच्या कर्जाचा मासिक ईएमआय तुमच्या पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
आम्ही तुम्हाला20/4/10 फॉर्म्युल्याची सविस्तर माहिती दिली आहे. आता तुम्ही कधीही तुमच्या बजेटनुसार कार घेऊ शकता. तुमचं नुकसान टळू शकेल.
