AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax: आयकर खात्याकडून ‘हे’ दोन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

Income Tax | सध्या Income Tax E-Filing पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे CBDT ने हे फॉर्म जमा करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार आता करदात्यांना 15 जुलैपर्यंत हे फॉर्म अधिकृत डीलर्सकडे सबमिट करता येतील

Income Tax: आयकर खात्याकडून 'हे' दोन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
इन्कम टॅक्स
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 10:49 AM
Share

मुंबई: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) सोमवारी करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला. CBDT ने इन्कम टॅक्स फॉर्म 15CA आणि 15CB जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आयकराच्या नियमानुसार हे फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा करणे बंधनकारक आहे. (cbdt extends deadline to submit income tax form from 15 CA and 15 CB)

परदेशातून आलेल्या पैशांसाठी अधिकृत डिलरकडे एक प्रत द्यावी लागते. त्यापूर्वी करदात्यांना 15CA आणि 15CB हे फॉर्म ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असते. मात्र, सध्या Income Tax E-Filing पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे CBDT ने हे फॉर्म जमा करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार आता करदात्यांना 15 जुलैपर्यंत हे फॉर्म अधिकृत डीलर्सकडे सबमिट करता येतील. तर डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (Document Identification Number) जनरेट करण्यासाठी ई पोर्टलवर दोन्ही फॉर्म जमा करण्याची सुविधा आणखी काही दिवसांनी सुरु होईल.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

New e-filing portal: नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 40 तांत्रिक अडचणी

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

इन्कम टॅक्स विभागाचं नव पोर्टल पहिल्या दिवशी डाऊन, निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसला विचारला जाब

(cbdt extends deadline to submit income tax form from 15 CA and 15 CB)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.