Income Tax : केंद्र सरकारने दिली आनंदवार्ता! जुन्या कर रचनेत मिळेल असा फायदा

Income Tax : नवीन कर रचनेत काही लाभ मिळतात. परंतु, यामध्ये गुंतवणुकीवर सवलत मिळत नाही. नवीन कर रचनेत केंद्र सरकारने स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ आवश्य मिळतो. परंतु, तुम्हाला गुंतवणुकीवर अधिक सवलत, सूट हवी असेल तर जुनी कर रचना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकते.

Income Tax : केंद्र सरकारने दिली आनंदवार्ता! जुन्या कर रचनेत मिळेल असा फायदा
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 7:49 PM

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला. त्यात त्यांनी आयकरमध्ये (Income Tax) मोठा बदल केला. निर्मला सीतारमण यांनी नवीन कर रचनेसंबंधी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने स्वीकारलेली नवीन कर रचना या आर्थिक वर्ष 2023-24 पासून अनिवार्य असेल असे त्यांनी जाहीर केले. नवीन कर व्यवस्थेत (New Tax Regime) करदात्यांना आता 7 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर कर सवलत मिळेल. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन कर व्यवस्थेत 7 लाख रुपयांपर्यंत सवलत दिल्याने करदात्यांना करांमध्ये 33,800 रुपयांची बचत होईल.

सवलतीचा अर्थ काय नवीन कर रचनेत 7 लाख रुपयांपर्यंत कर मुक्तता मिळत असली तरी गुंतवणुकीवर त्याचा फार मोठा फायदा होत नाही. गुंतवणुकीवर सवलत मिळत नाही. नवीन कर रचनेत मानक वजावट (Standard Deduction) मिळते. पण तुम्हाला गुंतवणुकीवर सवलत अथवा सूट हवी असेल तर मात्र जुनी कर रचना तुमच्या मदतीला येते. जुन्या कर रचनेत तुम्हाला फायदा मिळतो.

मोबाईल ॲप आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल ॲप सुरु केले आहे. ॲपच्या माध्यमातून करदात्यांना टीडीएससंबंधीची माहिती मिळेल. वार्षिक सूचना विवरण (AIS) मोबाईलवर पाहता येईल. विभागाने बुधवारी करदात्यांना ॲपचा काय फायदा होईल याची माहिती दिली. उत्पन्नाच्या स्त्रोतवर कपात, कर संग्रह (टीडीएस/टीसीएस), व्याज, लाभांश आणि शेअरविषयीची माहिती घेता येईल. करदात्यांना त्यांचे मतही मांडता येईल. त्यांना सूचना करता येतील. करदात्याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून वार्षिक सूचना विवरण , करदात्यांसाठीच्या सूचना उपलब्ध होतील.

हे सुद्धा वाचा

करदात्यांना मोबाईल ॲप गुगल प्ले आणि ॲप स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDC) ने या मोबाईल ॲप विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, या माध्यमातून, नोटिफिकेशनमधून करदात्यांना आयकर विभागाच्या सूचना प्राप्त होतील. ते अपडेट राहतील. त्यांना कर पात्र उत्पन्न आणि इतर माहिती सहज मिळेल. टीडीएस/टीसीएस, व्याज, लाभांश, आयकर रिफंड, इतर गोष्टींची माहिती मिळेल.

जुन्या कर रचनेत मिळणाऱ्या सवलती

  1. 1. स्टँडर्ड डिडक्शन : नोकरदारासाठी 50000 रुपयांची मानक वजावट
  2. 2. कलम 80 सीसीडी (1बी) : NPS खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर 50,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त सूट
  3. 3. कलम 80टीटीए : हिंदू अविभक्त कुटुंबासाठी बँक, सहकारी बँका, पोस्ट कार्यालयामधील बचत खात्यातील व्याजावर जास्तीत जास्त 10,000 रुपयांची कर कपात मिळते.
  4. 4. कलम 80D : आरोग्य विम्यासाठी प्रीमियम कपातीला यामुळे मंजुरी मिळते.
  5. 5. कलम 80G : पात्र ट्रस्ट आणि धर्मार्थ संस्थांना देण्यात येणाऱ्या देणग्या, दान यांच्यासाठी कपात
  6. 6. कलम 80सी: ईपीएफ आणि पीपीएफ, ईएलएसएस, जीवन विमा प्रीमियम, गृह कर्ज फेड, एसएसवाय, एनएससी आणि एससीएसएस या योजनांमधील गुंतवणुकीवर सवलत मिळते.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.