पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?

रब्बी हंगामात येणारा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करुन साठवून ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Central Govt control on onion rates)

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?
Onion Rate cheaper
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 4:54 PM

नवी दिल्ली: कांद्याच्या दरामुळे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अधिक दरानं कांदा खरेदी करावा लागला होता. यामुळे केंद्र सरकारनं ग्राहकांना कमी दरात कांदा मिळावा म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. ज्यावेळी बाजारात दर वाढतील त्यावेळी सरकार कांदा बाजारत आणेल. रब्बी हंगामात येणारा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करुन साठवून ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

कांद्याचा साठा वाढवणार

ग्राहक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कांदा साठवण्याची मर्यादा एक लाख टनांवरुन वाढवून 1.5 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी कांद्याचे दर वाढल्यामुळे सरकारला अफगाणिस्तानातून कांदा आयात करावा लागला होता. सरकारने दर स्थिरीकरण निधीअंतर्गत 99 हजार टन कांदा खरेदी केला आहे. आतापर्यंत 63 हजार110 टन कांदा राज्यांना पुरवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

कांदा साठवणुकीवर मर्यादा

ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. केंद्रानं हा निर्णय 23 ऑक्टोबरला घेतला होता. सरकारनं किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. किरकोळ व्यापारी 2 टन कांदा साठवू शकतात, तर ठोक व्यापारी 25 टनांपर्यंत कांदा साठवूण ठेऊ शकतात.

कांदा निर्यातीवर बंदी

केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यानंतर कांदा निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला होता. कांद्याच्या निर्यातीवर केंद्रानं बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी टीकास्त्र सोडले होते. (Central Govt make new plan to control price of onion in next year)

वातावरण बदलाचा कांदा उत्पादकांना अकराशे ते बाराशे कोटींचा फटका

कांदा म्हटला की वांदा हा शब्द येतोच, बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने कांदा उत्पादकांचे वांदे झाले आहे. दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरामध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळाचा थेट परिणामामुळे पाऊस झाला. पावसाच्या हलक्या सरी ,ढगाळ वातावरण तसेच धुक्यामुळे कांदा पिकावर मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे लागवडीवर परिणाम होत उत्पादन घटल्याने अंदाजे अकराशे ते बाराशे कोटी रुपयांचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या:

इजिप्त, इराण आणि इराकमधून कांद्याची आवक, लासलगाव बाजारात कांद्याचे दर गडगडले

तुर्कस्तानचा 100 टन आयात कांदा पिंपळगाव बसवंत इथं दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

(Central Govt make new plan to control price of onion in next year)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.