‘मिंत्रा-जबाँग’ला धक्का, CEO अनंत नारायणन यांचा राजीनामा

'मिंत्रा-जबाँग'ला धक्का, CEO अनंत नारायणन यांचा राजीनामा

मुंबई : फ्लिपकार्टचे संस्थापक कंपनीतून बाहेर गेल्यानंतर आता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. फॅशनच्या क्षेत्रात नावाजलेल्या मिंत्रा आणि जबाँग कंपनीचे सीईओ अनंत नारायणन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. गेली साडेतीन वर्षे ते मिंत्रा आणि जबाँग या कंपन्यांच्या सीईओपदी होते.

वॉलमार्ट या मूळ कंपनीशी संबंधित फ्लिपकार्ट, मिंत्रा, जबाँग या सर्व कंपन्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच फ्लिपकार्टने मिंत्रा आणि जबाँग कंपन्या खरेदी केल्या होत्या. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर अनंत नारायणन सुद्धा कंपनीतून बाहेर पडतील, अशी शक्यता ई-कॉमर्स क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली होती आणि झालेही तसेच.

मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही कंपन्यांना फॅशनच्या जगतात पुढे नेण्याचं काम गेल्या साडेतीन वर्षात केल्याची प्रतिक्रिया अनंत नारायणन यांनी राजीनामा देताना व्यक्त केली. अनंत नारायणन यांच्या साडेतीन वर्षांच्या सीईओपदाच्या काळात मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठी प्रगती केली आहे.

ई-कॉमर्समधील सूत्रांच्या माहितीनुसार, अनंत नारायणन हे ‘हॉटस्टार’मध्ये जाऊ शकतात. हॉटस्टार हे कंटेट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.

अमर नगरम हे अनंत नारायणन यांचे आता काम पाहतील. मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही कंपन्यांची जबाबदारी सध्या अमर नगरम यांच्याकडे देण्यात आली आहे. अमर नगरम हे गेल्या सात वर्षांपासून फ्लिपकार्ट कंपनीशी जोडलेले आहेत. मोबाईल शॉपिंग अधिक लोकप्रिय करण्यात अमर नगरम यांची भूमिका मोलाची मानली जाते. त्यामुळेच मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही कंपन्यांचं सीईओपद अमर नगरम यांच्याकडे देण्यात आले आहे.

संबंधित बातमी : फ्लिपकार्टच्या सीईओचा राजीनामा

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI