AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chandrayaan 3 update | चांद्रयान 3 बद्दल एक बातमी, 145 मिनिटात ‘या’ कंपनीची 1166 कोटींची कमाई

chandrayaan 3 update | उद्या बॅटरी चालली, तर 'या' कंपनीला लॉटरी लागेल ?. चांद्रयान-3 च्या यशामध्ये अनेक भारतीय कंपन्यांच योगदान आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढू दिसून आली आहे. इस्रोने चांद्रयान-3 मिशनमध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला.

chandrayaan 3 update | चांद्रयान 3 बद्दल एक बातमी, 145 मिनिटात 'या' कंपनीची 1166 कोटींची कमाई
Moon Mission
| Updated on: Sep 21, 2023 | 3:17 PM
Share

मुंबई : चांद्रयान-3 ने चंद्रावर 23 ऑगस्टला यशस्वी लँडिंग केलं. आता 22 सप्टेंबरला चंद्रावर पुन्हा दिवस उजाडेल. चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस सूर्यप्रकाश असतो. इस्रोने टि्वट करुन ही माहिती दिलीय. चांद्रयान-3 मिशनच्या यशामध्ये अनेक भारतीय कंपन्यांच योगदान आहे. सध्या चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर ही दोन उपकरण आहेत. ही दोन्ही उपकरण सूर्यप्रकाशावर चालतात. त्यांना सौर ऊर्जेची गरज असते. त्यामुळे लँडिंगनंतर 10 दिवसांनी या दोन्ही उपकरणांना स्लीप मोडमध्ये टाकण्यात आलं होतं. आता उद्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येईल. त्यावेळी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सुरु करण्याचा प्रयत्न होईल. चांद्रयान-3 च्या यशामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच योगदान आहे. गुरुवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 2 टक्क्याने हे शेअर्स वाढले.

गुरुवारी सकाळी मार्केट उघडलं, त्यावेळी भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्ये उसळी दिसून आली. सकाळी 9.15 ते 11.40 दरम्यान कंपनीचा शेअर 126.30 रुपयांवर पोहोचला. या दरम्यान कंपनीच मार्केट कॅप 43055 कोटी रुपयावरुन 44221 कोटी रुपयांवर पोहोचलं. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1166 कोटी रुपयांची वाढ झाली. चांद्रयान-3 च्या यशामध्ये अनेक सरकारी कंपन्यांच योगदान होतं. यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच महत्त्वाच योगदान होतं. BHEL योगदान काय?

चांद्रयान-3 मिशनमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने बॅटरीचा पुरवठा केला होता. कंपनीने मिशनसाठी बॉय मॅटेलिक एडेपडर्सचा पुरवठा केला होता. चांद्रयान-3 ला चंद्राच्या पुष्ठभागावर उतरवण्यासाठी इस्रोने स्वदेशी टेक्नोलॉजी विकसित केली. टायटेनियम प्रोपेलेंट टँक तसेच प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्युलला लागणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती केली होती. त्यामुळेच चंद्रावर चांद्रयान-3 च यशस्वी लँडिंग शक्य झालं. चंद्रावर मायनस 200 मध्ये तापमान असतं. या वातावरणात उपकरण गोठून जातात. उद्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कमाडं दिल्यानंतर सुरु झाले, तर ती एक मोठी बाब ठरेल. इस्रोने दोन्ही उपकरणांची निर्मिती सौर ऊर्जेवर कार्यरत राहतील अशा पद्धतीने केली होती. दोन्ही उपकरणांच आयुष्य 14 दिवस होतं. उद्या कमांड दिल्यानंतर ही उपकरण चालू झाली, तर ते सुद्धा एक मोठ यश असेल. अशावेळी काही कंपन्यांचे शेअर्स वधारु शकतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना