CNG prices hike: पुणेकरांना महागाईचा आणखी एक धक्का, सीएनजी महागला; जाणून घ्या नवे दर

पुणेकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. सीएजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचे दर प्रति किलोमागे दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

CNG prices hike: पुणेकरांना महागाईचा आणखी एक धक्का, सीएनजी महागला; जाणून घ्या नवे दर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 8:04 AM

पुणेकरांना (pune) महागाईचा (Inflation) आणखी एक धक्का बसला आहे. सीएजीच्या दरात (CNG rate) पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचे दर प्रति किलोमागे दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने आता सीएनजीचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. एकीकडे राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. पुण्यात दीड महिन्यांपूर्वी सीएनजीचे दर 68 रुपये होते. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते 73 रुपयांवर पोहोचले होते. तेव्हापासून सीएनजीच्या दरात वाढ सुरूच असून, गेल्या दीड महिन्यामध्ये सीएनजीचे दर  68 रुपये प्रति किलोवरून 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल बारा रुपयांची वाढ झाली आहे.

व्हॅटमध्ये कपात

दरम्यान पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा, सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने जीएनजीवरील व्हॅट कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार सीएनजी, पीएनजीवरील व्हॅट कपात करून नवे दर लागू करण्यात आले होते. नव्या दरानुसार सीएनजी सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र त्यानंतर गॅस पुरवठा कंपन्यांकडून इंधनाच्या दरवाढीचा धडाका सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

पेट्रोल, डिझेल आजही स्थिर

एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅसचे दर वाढत आहे. आज पुण्यात सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे चालू महिन्यात घरगुती एलपीजी गॅसी सिलिंडरच्या दरात देखील दोनदा वाढ करण्यात आली आहे. सात मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर पन्नास रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली. इतर इंधनाचे दर वाढत असताना पेट्रोल, डिझेलचे दर मात्र गेल्या दीड महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.