Crude Oil Trading : कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसमधून करा बक्कळ कमाई! पुढील महिन्यापासून करा ट्रेडिंग

Crude Oil Trading : आतापर्यंत कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस किती वाढले, कमी झाले याकडे आपले लक्ष होते. पण आता त्यातूनच बक्कळ कमाईचा पर्याय मिळणार आहे.

Crude Oil Trading : कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसमधून करा बक्कळ कमाई! पुढील महिन्यापासून करा ट्रेडिंग
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 4:38 PM

नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमतीवरुन पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होईल अथवा महागेल, हेच आतापर्यंत आपण पाहिले. महागाईच्या झळा मोजण्यासाठी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू हे मोठे परिमापक समजण्यात येतात. पण आता कच्चे तेल आणि गॅसमधून तुम्हाला कमाई करता येणार आहे. देशातील सर्वात मोठा निर्देशांक नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) शुक्रवारी याविषयीची मोठी घोषणा केली. एनएसईनुसार, आता फ्युचर ॲंड ऑप्शन अंतर्गत कच्चे तेल आणि गॅसवर ट्रेडिंग (Crude Oil and Natural Gas Trading) करुन कमाई करता येईल. त्यामुळे आता गुंतवणुकीसह कमाईचा आणखी एक पर्याय समोर आला आहे.

कधी आहे मुहूर्त नॅशनल स्टॉक एक्सचेंजने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार एनएसईवर गुंतवणूकदारांना 15 मेपासून फ्युचर ॲंड ऑप्शन अंतर्गत WTI (West Texas Intermediate) मध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसवर फ्युचर कॉन्ट्रॅक्टची सुरुवात करता येईल. एनएसईने याविषयीचे एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, 15 मेपासून गुंतवणूकदारांना जिंस फ्युचर ॲंड ऑप्शन अंतर्गत वायदे बाजारात नशीब आजमविता येईल

गेल्या महिन्यात मंजूरी NSEने गेल्या महिन्यात याविषयीची मंजूरी मागितली होती. बाजार नियामक सेबीने याविषयीची परवानगी दिली. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाने, सेबीने मंजूरी दिल्यानंतर गुंतवणूकदारांना ट्रेंडिंग करता येईल. फ्युचर ॲंड ऑप्शन अंतर्गत WTI (West Texas Intermediate) मध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसवर फ्युचर कॉन्ट्रॅक्टची सुरुवात करता येईल. भविष्यात हे सेगमेंट अजून व्यापक होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

कपातीची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओपेकसह इतर तेल उत्पादक देशांनी तेलाचे 1.16 दशलक्ष बॅरल प्रति दिवस उत्पादन कपात केले. अर्थात हा जोर का झटका हळूवारपणे देण्यात आला. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच देशांच्या तोंडचे पाणी पळाले. अर्थात हा दबावतंत्राचा भाग आहे. रशियाने गेल्या महिन्यातच जूनपर्यंत तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय जाहीर केला होता.

भावात चढउतार फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती 139 डॉलर प्रति बॅरल झाल्या. 2008 नंतर पहिल्यांदाच किंमती एवढ्या वाढल्या होत्या. अमेरिका आणि रशियाने त्यांचे राखीव कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले. त्यानंतर किंमतीत घसरण झाली. त्यामुळे मार्च 2023 मध्ये किंमती घसरुन 75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आता या किंमती पुन्हा 90 डॉलरच्या घरात पोहचल्या आहेत. मे आणि जून महिन्यात हे भाव 100 डॉलरच्या घरात पोहचू शकतात.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.