Petrol Diesel Price Today : कच्चा तेलात चढउतार, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे वाढले का भाव

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे. काल घसरलेले क्रूड ऑईल आज पुन्हा चढ्यादराने विक्री झाले. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच किंमती अपडेट केल्या, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले का?

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलात चढउतार, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे वाढले का भाव
कच्चे तेल वधारले
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात भूराजकीय घडामोडींचा आर्थिक व्यवहारांवर पण मोठा परिणाम होत आहे. कच्चे तेल, सोने-चांदी, शेअर बाजार, आयात-निर्यात यामध्ये अस्थिरता दिसून येत आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) आता सातत्याने चढउतार होत आहे. काल क्रूड ऑईलचा भाव घसरला होता. आज कच्चा तेलाची चढ्या दराने विक्री झाली. त्यातच युक्रेन युद्धावरुन अमेरिका-युरोप आणि रशिया असे दोन गट पडले आहे. कुरघोडी करण्यासाठी ते कच्चा तेल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून घसरणीवर असलेले दर पुन्हा भडकले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती जाहीर केल्या. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price Today) वाढले का?

कच्चा तेलाचा रोख काय

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली. आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) वधारले. किंमती 74 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 79 डॉलर प्रत‍ि बॅरल झाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सध्या भारतीय इंधन बाजारावर परिणाम होत असला तरी जनतेला त्याची झळ गेल्यावर्षी मे महिन्यापासून जाणवली नाही.

हे सुद्धा वाचा

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.