AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crypto Currency | या देशातील लोक क्रिप्टो गुंतवणुकीत सर्वात पुढे, शेजारी पाकिस्तान पण नाही मागे

Crypto Currency | क्रिप्टो बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. बिटकॉईनने तर मोठा रेकॉर्ड केला आहे. बिटकॉईन मोठी मजल मारण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीकडे पुन्हा अनेकांची पावले वळली आहेत. तुम्हाला माहिती आहे का भारतापेक्षा पाकिस्तानी क्रिप्टोत अधिक गुंतवणूक करतात ते?

Crypto Currency | या देशातील लोक क्रिप्टो गुंतवणुकीत सर्वात पुढे, शेजारी पाकिस्तान पण नाही मागे
क्रिप्टोत गुंतवणूकीत कोण पुढे
| Updated on: Mar 10, 2024 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली | 10 March 2024 : तर क्रिप्टो बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. बिटकॉईनने तर चारचांद लावले आहे. गुंतवणूकदारांची सध्या बल्ले बल्ले सुरु आहे. पण क्रिप्टो करन्सीत सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तान नागरिक भारतीय गुंतवणूकदारांपेक्षा क्रिप्टोत अधिक गुंतवणूक करतात हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे या यादीत विकसीत आणि मोठे देश अत्यंत पिछाडीवर आहेत. तर काही छोट्या छोट्या देशांनी टॉप-10 मध्ये स्थान पटकावले आहे.

काय सांगते रॅकिंग

तर लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन क्रिप्टो ऑनर्स (Crypto owners) आधारे ही यादी तयार केली आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स ने ही यादी तयार केली आहे. टॉप-10 मध्ये सर्वात टॉपवर संयुक्त अरब अमिरात आहे. UAE च्या एकूण लोकसंख्येपैकी 30.39 टक्के लोक क्रिप्टो ऑनर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम हा देश आहे. 21.19 टक्के व्हिएतनामी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करतात. तर अमेरिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील 15.56 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात.

चौथ्य स्थानावर इराण

या यादीत चौथ्या क्रमांकावर इराण हा देश आहे. यातील 13.46 टक्के लोक क्रिप्टो ऑनर्स आहेत. पाचव्या क्रमांकावर फिलिपिन्सचा क्रमांक आहे. या देशातील 13.43 टक्के लोक क्रिप्टो चलनात गुंतवणूक करतात. ब्राझिलमधील 11.99 टक्के लोक क्रिप्टो ऑनर्स आहेत. त्यानंतर सौदी अरबमधील 11.37 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. सिंगापूर 11.05 क्रिप्टो ऑनर्ससह आठव्या क्रमांकावर आहेत. नवव्या क्रमांकावर युक्रेन हा देश आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या 10.57 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. या यादीत 10 व्या क्रमांकावर व्हेनेझुएला हा देश आहे. येथील 10.30 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात.

पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे

  • आपला शेजारी पाकिस्तान पण यादीत पुढे आहे. या रॅकिंगमध्ये त्याने भारताला पण मागे टाकले आहे. पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या 6.60 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. रॅकिंगनुसार, पाकिस्तान 15 व्या क्रमांक आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. भारत या यादीत 16 व्या क्रमांकावर आहे. हा एकूण लोकसंख्येच्या 6.55 टक्का आहे.
  • मॅक्सिकोतील 6.55 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. या यादीत रशियाचा 18 वा क्रमांक आहे. जर्मनी या यादीत 20 व्या स्थानावर आहे. इंग्लंड यादीत 21 व्या क्रमांकावर आहे. चीन तर 29 व्या क्रमांकावर आहे. या देशातील एकूण लोकसंख्येच्या 4.15 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल