AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TDS Penalty News | आता रोज 200 रुपयांचा दंडम, वेळेत दाखल करा TDS, अन्यथा भूर्दंड

TDS Penalty News | आयकर रिटर्न भरण्यास तुम्हाला उशीर झाला तर दररोज 200 रुपये दंड भरायला तयार रहा. नियमातील हा बद्दल समजून घ्या.

TDS Penalty News | आता रोज 200 रुपयांचा दंडम, वेळेत दाखल करा TDS, अन्यथा भूर्दंड
नाहीतर भूर्दंडImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 24, 2022 | 6:21 PM
Share

TDS Penalty News | आयकर रिटर्न (Income Tax Return) भरण्यास तुम्हाला उशीर झाला तर आता दररोज 200 रुपये दंड (Penalty) भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड केवळ 100 रुपये होता. कर जमा करण्याव्यतिरिक्त, कर कपात होत असेल तर टीडीएस रिटर्न (TDS Return) ही भरला पाहिजे. टीडीएस रिटर्न हे असे विवरण आहे जे दर तीन महिन्यांनी आयकर विभागाला दिले जाते. कर कपात करणार्‍यासाठी वेळेवर TDS रिटर्न सादर करणे आवश्यक आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्रत्येक तिमाहीनंतर TDS रिटर्न भरले जाते. एप्रिल-जून तिमाहीचे विवरणपत्र 31 जुलैपर्यंत भरावे लागेल. यासाठी फॉर्म 16 किंवा 16A आवश्यक आहे. आयकर विभागाने आयकर कलम 234-E अंतर्गत नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नियमानुसार, उत्पन्नावरील कर कपात (Return of Tax deducted At source-TDS) भरण्यास विसरल्यास शुल्क आणि दंड आकारला जाऊ शकतो.

यापूर्वी हा दंड केवळ 100 रुपये

प्राप्तिकराच्या सुधारित कलम 234-E अंतर्गत बदल झाले आहेत. TDS रिटर्न भरण्यासाठी एका दिवसासाठी 200 रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. कधी कधी ते टीडीएस परताव्याच्या रकमेइतके ही असू शकते. यापूर्वी, प्राप्तिकराच्या कलम 270-1 अंतर्गत, TDS चे त्रैमासिक रिटर्न उशिराने जमा केल्यास दररोज 100 रुपये दंड आकारला जात होता, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये नियोक्त्यांना हा दंड लागू नव्हता.

या प्रकरणात, प्राप्तिकर अधिकारी किमान 10 हजार रुपयांपासून कमाल 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारु शकतात. टीडीएसचे रिटर्न प्रत्येक तिमाहीनंतर पुढील महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत भरले जाते. एप्रिल-जून तिमाहीचे रिटर्न 31 जुलैपर्यंत भरायचे असते. यासाठी फॉर्म 16 किंवा 16A आवश्यक आहे.

1% ते 10% च्या मर्यादेत कर कपात

सरकार TDS आकारते. प्राप्तकर्त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर अथवा व्यवहाराच्या वेळी हा कर कापला जातो. पगार किंवा जीवन विमा पॉलिसी भरताना व्यवहार आणि पेमेंटच्या वेळी कर कापला जातो. त्यानंतर कर कपात करणारा (वैयक्तिक/कंपनी) ही TDS रक्कम आयकर विभागात जमा करते. TDS द्वारे, तुमच्या कराचा काही भाग आपोआप आयकर विभागाला दिला जातो. करचोरी कमी करण्यासाठी टीडीएस हा महत्त्वाचा उपाय मानला जातो. कर अनेकदा 1% ते 10% या दरम्यान कापला जातो.

TDS रिटर्न भरण्यास कोण पात्र आहे?

कर जमा करण्याव्यतिरिक्त, कपात करणार्‍याने टीडीएस रिटर्न देखील भरला पाहिजे. टीडीएस रिटर्न हे असे विवरण पत्र आहे जे दर तीन महिन्यांनी आयकर विभागाला दिले जाते. कर कपात करणार्‍यासाठी वेळेवर TDS परतावा सादर करणे आवश्यक आहे. TDS परतावा भरण्यासाठी संस्था अथवा कंपनीकडे वजावट खाते क्रमांक (TAN) असणे बंधनकारक आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.