AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, फक्त 24 तास नाहीतर तब्बल चार दिवस तिकीट चालणार

IRCTC ॲपच्या मदतीने तुम्ही मेट्रोची तिकिट देखील काढू शकता. आयआरसीटीसीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने वन इंडिया यांच्यासोबत हातमिळवणी केलीये. यामुळे तुम्ही थेट IRCTC अॅप किंवा वेबसाईटवरून मेट्रोचे तिकीट काढू शकता. यामुळे आता मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार हे तर नक्कीच आहे. ज्याप्रमाणे रेल्वेचे तिकीट बुक केले जाते, त्याच पद्धतीने आता मेट्रोचे तिकीटही बुक करता येणार.

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, फक्त 24 तास नाहीतर तब्बल चार दिवस तिकीट चालणार
| Updated on: Jul 11, 2024 | 11:57 PM
Share

मुंबई : मेट्रोने प्रवास केल्याने आपण अगदी कमी वेळामध्ये पोहोचतो. विशेष म्हणजे वाहतूककोडींची देखील समस्या नसते. यामुळे आपला वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो. म्हणून आता लोक मेट्रोने प्रवास करण्यावर अधिक भर देतात.  मेट्रोने प्रवास करत असणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता तुम्ही रेल्वेच्या तिकिटप्रमाणेच घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. तुम्ही घरी बसूनही आरामात मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. विशेष बाब म्हणजे तुमचे तिकिट 24 तासांनंतर एक्सपायर देखील होणार नाहीये.

आपण RCTC वरून ज्याप्रमाणे चार महिने अगोदर तिकीट बुक करू शकतो, तशीच सुविधा मेट्रोला देखील मिळणार आहे. आता तुम्हाला मेट्रोनेही प्रवास करण्यासाठी 120 दिवस अगोदर तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे तुम्ही काढलेले मेट्रोचे तिकीट हे चार दिवस वैध देखील ठरणार आहे. आता सध्या मेट्रोचे तिकीट दोन दिवसांसाठी वैध पकडले जाते. ही बातमी दिल्ली मेट्रो वाल्यांसाठी आहे.

मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला IRCTC च्या वेबसाइटवर किंवा ॲपवर जावे लागेल. IRCTC कडून मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या बुकिंग सिस्टममध्ये बदल केले जातील. क्यूआर कोडच्या मदतीने तुम्ही पैसे पे करू शकता. हेच नाहीतर त्या तिकीटाची प्रिंटआउट देखील तुम्ही मिळू शकता. सरळ आणि सोपा पर्याय म्हणजे मोबाईलमध्ये या तिकिटाची स्क्रीन शॉट देखील घेऊ शकता.

मेट्रो तिकीट बुकींग फक्त ज्या प्रवाशांकडे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम असलेला मोबाईल आहे, त्यांनाच करता येईल. ज्यांच्याकडे आयफोन आहे, अशा प्रवाशांना अजून काही दिवस वाट पाहवी लागेल. आयफोन असलेल्यांना मेट्रो तिकीट मोबाईलवरून बुक करता येणार नाहीये. मेट्रो तिकीटचे ऑनलाईन पद्धतीने काढता येणार असल्याने तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभा राहण्याची गरज प्रवाशांना नसणार आहे. यामुळे मोठा दिलासा प्रवाशांना नक्कीच मिळणार आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.