पुन्हा नोटबंदी ?, 500 रुपयांच्या नोटेवर खरंच येणार गंडांतर ?,तज्ज्ञांचे मत काय ?
500 रुपयांची नोट बंद होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. चला तर जाणून घेऊया खरंच आरबीआय 500 रुपयांची नोट बंद करणार आहे ? जर करत असेल यामागची कारण काय असू शकतात ? तज्ज्ञांचे मत काय चला तर जाणून घेऊया...

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अलिकडे केंद्र सरकारला 500 रुपये आणि त्याहून अधिक मुल्याच्या नोटांना बंद करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर 500 रुपयांच्या नोटांना पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आरबीआय खरोखरंच असे करु शकते का ? याबाबत टीव्ही 9 ने बँकिंग एक्सपर्टशी बातचीत केली आहे. त्यांनी सांगितले की आरबीआय लवकरच याबाबतचा निर्णय घेऊ शकते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अलिकडे केंद्र सरकारला 500 रुपये आणि त्याहून अधिक मुल्याच्या नोटांना बंद करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर 500 रुपयांच्या नोटांना पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आरबीआय खरोखरंच असे करु शकते का ? याबाबत टीव्ही 9 ने बँकिंग एक्सपर्टशी बातचीत केली आहे. त्यांनी सांगितले की आरबीआय लवकरच याबाबतचा निर्णय घेऊ शकते.
आरबीआय नोटाबंदीप्रमाणे या नोटांवर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेणार नाही. उलट, ते प्रथम त्यांची छपाई थांबवून बाजारात पाचशेच्या नोटांची संख्या कमी करण्याचे काम करेल. यासाठी, बँक 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रमाण देखील वाढवू शकते. बँकांमधील एटीएममध्ये त्यांची संख्या देखील वाढवली जाईल आणि 500 रुपयांच्या नोटा हळूहळू बाजारातून काढून बँकांमध्ये जमा केल्या जातील. ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार नाही. परंतु आरबीआयने ते करण्याची योजना आखली आहे. सरकार मार्च 2026 पर्यंत यावर निर्णय घेऊ शकते असे बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा यांनी म्हटले आहे.
ही आहेत कारणे
आरबीआय 500 रुपयांच्या मुल्याच्या नोटांवर बंदी आणण्याची शक्यता आहे. असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या मागे काय आहेत नेमकी कारणे ते पाहूयात..
1. ब्लॅक मनीवर अंकुश
सरकार ब्लॅक मनीवर अंकुश लावण्यासाठी 500 रुपयांच्या नोटांवर बंदी लादू शकते. देशात कुठेही जेव्हा इन्कम टॅक्सची रेड पडली की पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल्स सापडत आहेत. त्यामुळे भष्ट्राचाराचा मार्ग बंद करण्यासाठी आधी ज्या प्रमाणे एक हजार नंतर दोन हजाराची नोट बंद केली तशी वेळ 500च्या नोटांवर येण्याची शक्यता आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय होऊ शकतो.
2. छोट्या नोटांना प्रोत्साहन
आरबीआय छोट्या नोटांना प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा बाजारातून कमी करण्यासाठी त्यांची छपाई बंद करुन एटीएम आणि बँकांच 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रमाण वाढवले जाऊ शकते. जेवढ्या पाचशेच्या नोटा बंद होतील तेवढे कमी मुल्यांच्या नोटांची छपाई केली जाईल असे म्हटले जात आहे.
3. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन
सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या मुल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याची तयारी केली आहे. सरकार मोठ्या नोटांना बॅन करण्याच्या तयारीला लागली आहे. डिजिटल पेमेंटला आपलेसे केल्याने ब्लॅक मनी ओळखणे सोपे जाणार आहे.तसेच नागरिकांनाही पैसे खिशात बाळगण्याची गरज राहणार नाही.
