Bill : जे बात, एकाच बिलावर वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या जेवणाची चाखा चव, या पोर्टलवर द्या की ऑर्डर..

Bill : आता तुम्हाला एकाच बिलावर वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या जेवणाची चव चाखता येणार आहे..

Bill : जे बात, एकाच बिलावर वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या जेवणाची चाखा चव, या पोर्टलवर द्या की ऑर्डर..
Online FoodImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 6:19 PM

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही एकाच रेस्टॉरंटमधून (Restaurant) जेवण, स्नॅक्स मागवत होते. त्यासाठी ऑनलाईन ऑर्डरही (Online Order) देता. आता ऑनलाईन जेवण ऑर्डरचा एक नवीन अनुभव घेता येईल. तीन उद्योजकांनी एकत्र येऊन ऑनलाईन पोर्टल ‘वेडिंगो‘(VendiGo) ची सुरुवात केली आहे.

वेडिंगो या ऑनलाईन पोर्टलवरुन तुम्हाला एकाच बिलावरुन अनेक रेस्टॉरंटचे आवडते जेवण मागविता येणार आहे. वेडिंगो हे एक स्टार्टअप असून त्यांनी विविध रेस्टॉरंटमधून एकाच बिलावर जेवणाची ऑर्डर देता येणार आहे.

या बातमीनुसार, जेवण एकाच बिलावर ऑर्डर (different restaurant ordering on one bill) करता येईल. त्यानंतर तुमच्या सुविधेनुसार, तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येईल. या पोर्टलवर केवळ ऑर्डरच करता येणार नाही, तर तुम्ही वेळ आणि ठिकाण ही निश्चित करु शकाल.

हे सुद्धा वाचा

वेडिंगोवर (VendiGo) ऑर्डर दिल्यानंतर पेमेंट होताच ग्राहक एका किओस्क बॉक्स नंबरवरुन त्यांची ऑर्डर प्राप्त करु शकतील. त्यामुळे त्यांना एकाच बिलावर विविध रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ बोलावता येतील आणि त्याची चव चाखता येईल.

वेडिंगो स्थापना मनोज देथन (Manoj Dethan), अनिश सुहैल (Anees Suhail) आणि किरण करुणाकरण (Kiran Karunakaran) यांनी मिळून केली होती. देथन हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी संभाळत आहेत. तर सुहैल मुख्य तांत्रिक अधिकारी असून करुणाकरण यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.

वेडिंगो, शहरातील मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅफे आणि बेकरी यांच्याशी टायअप आहे. त्याआधारे तुम्ही दिलेल्या ऑर्डरनंतर त्याठिकाणाहून पदार्थ पिकअप करुन तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आणि स्थळानुसार डिलिव्हरी केल्या जाते.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.