PMGKY योजनेंतर्गत 6 कोटी टन अन्नधान्याचे वाटप; 80 कोटी लोकांना मोफत रेशन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत केंद्र सरकार 80 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिलेल्या सामान्य कोट्यापेक्षा जास्त दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य अतिरिक्त प्रमाणात मोफत देत आहे. सुरुवातीला PMGKAY अंतर्गत हा अतिरिक्त विनामूल्य लाभ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी (एप्रिल-जून 2020) प्रदान करण्यात आला.

PMGKY योजनेंतर्गत 6 कोटी टन अन्नधान्याचे वाटप; 80 कोटी लोकांना मोफत रेशन
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 1:12 PM

नवी दिल्लीः कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या दरम्यान केंद्र सरकारने रेशन कार्ड धारक कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY योजना) लागू केलीय. या अंतर्गत 80 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना सामान्य कोट्यात उपलब्ध अन्नधान्यांव्यतिरिक्त दरमहा 5 किलो अतिरिक्त अन्न धान्य दिले जात आहे. सरकारी निवेदनानुसार, या योजनेंतर्गत सुमारे 600 लाख टन म्हणजे 6 कोटी अन्नधान्य मोफत वितरणासाठी वाटप करण्यात आले होते, त्यापैकी 15 सप्टेंबरपर्यंत राज्यांनी 83 टक्के अन्नधान्य उचलले आहे. कोविड 19 साथीच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक अडथळ्यांमुळे गरीब आणि गरजूंना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी PMGKY ची घोषणा केली होती.

संकट पाहता सरकारने योजना वाढवली

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत केंद्र सरकार 80 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिलेल्या सामान्य कोट्यापेक्षा जास्त दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य अतिरिक्त प्रमाणात मोफत देत आहे. सुरुवातीला PMGKAY अंतर्गत हा अतिरिक्त विनामूल्य लाभ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी (एप्रिल-जून 2020) प्रदान करण्यात आला. संकट कायम राहिल्याने कार्यक्रम आणखी पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2020) वाढवण्यात आला. साथीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रारंभाच्या वेळी, पीएमजीकेवाय पुन्हा एकदा दोन महिन्यांसाठी (मे-जून 2021) पुन्हा सुरू करण्यात आला आणि पुढील पाच महिन्यांच्या कालावधीसाठी (जुलै-नोव्हेंबर 2021) आणखी वाढवण्यात आला.

चौथ्या टप्प्यात नोव्हेंबरपर्यंत धान्य उपलब्ध होणार

“भारत सरकारने आतापर्यंत चार टप्प्यांत पीएमजीकेएवाय योजनेंतर्गत सुमारे 600 लाख टन अन्नधान्याचे वाटप केले. योजनेंतर्गत सर्व टप्प्यांमध्ये केलेल्या एकूण वाटपांपैकी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 82.76 टक्के अन्नधान्य उचलले गेले होते. चौथा टप्पा नोव्हेंबर 2021 मध्ये संपेल.

कोणत्या राज्याने किती धान्य उचलले ते जाणून घ्या

केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार चौथ्या टप्प्यात सर्वाधिक धान्य उचलून सर्वात वर आहे. पीएमजीकेएवाय चार टप्प्याअंतर्गत वाटप केलेल्या अन्नधान्यांपैकी 93 टक्के अन्नधान्य उचलले, त्यानंतर ओडिशा 92 टक्के आहे. त्रिपुरा आणि मेघालय 73-73 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, तर तेलंगणा, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशने 15 सप्टेंबरपर्यंत 71 टक्के अन्नधान्य उचलले. एनएफएसए अंतर्गत सरकार 80 कोटी लोकांना दरमहा 5 किलो धान्य अत्यंत अनुदानित दराने 1-3 रुपये प्रति किलो दराने पुरवते. अंत्योदय अन्न योजना (AAY) प्रति कुटुंब 35 किलो प्रतिमहिना पुरवते.

संबंधित बातम्या

पोस्टाची विशेष योजना; दरमहा 10 हजार जमा करा अन् 16 लाख मिळवा

येत्या 7 दिवसांत तुम्ही ‘ही’ 4 कामे हाताळणे आवश्यक, अन्यथा खाते बंद

Distribution of 6 crore tonnes of foodgrains under PMGKY scheme; Free rations to 80 crore people

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.