AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divya Gokulnath Net Worth : कोण आहेत दिव्या गोकुळनाथ? संपत्ती इतकी की मोजायला पुरणार नाही वर्ष!

Divya Gokulnath Net Worth : शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या अनेक महिला शिक्षिका आपल्याला माहिती आहे. पण काही स्टार्टअपने देशात क्रांती आणून शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यात एका शिक्षिकेने मोठी भूमिका बजावली आहे. आज ती कोट्याधीश नाहीतर अब्जाधीश आहे.

Divya Gokulnath Net Worth : कोण आहेत दिव्या गोकुळनाथ? संपत्ती इतकी की मोजायला पुरणार नाही वर्ष!
| Updated on: Mar 11, 2023 | 9:25 AM
Share

नवी दिल्ली : विचार माणसाला बदलतात. पण त्यासाठी स्वतःत बदल घडवावा लागतो. कोरोनानंतर देशातील शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल आपण अनुभवत आहोत. क्लासरुम आता थेट घरात आले आहेत. पूर्वी शाळेत गेल्याशिवाय शिक्षण मिळत नव्हते. पण आता ऑनलाईनमुळे शिक्षण (Online Education) क्षेत्रात क्रांती आली. घर बसल्या शिक्षणाचे दार उघडले. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या अनेक महिला शिक्षिका आपल्याला माहिती आहे. पण काही स्टार्टअपने देशात क्रांती आणून शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यात एका शिक्षिकेने मोठी भूमिका बजावली आहे. तर ही महिला शिक्षिका आहे, दिव्या गोकुळनाथ (Divya Gokulnath). आज ती कोट्याधीश नाहीतर अब्जाधीश आहे. तिच्या संपत्तीचे (Networth ) आकडे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

आजपासून दहा वर्षांपूर्वी बायजूज ही कंपनी स्थापन झाली. बंगळुरुच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील दिव्या गोकुळनाथ या संस्थेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून शिक्षण रोचक आणि मजेदार, आकलनक्षम करण्यावर दिव्या यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्या बायजूजच्या सहसंस्थापक संचालक आहेत. मजेत परेशानी सुरु आहे, असे आपण अनेकदा म्हणतो. पण दिव्या यांच्या मेहनतीला रंग चढला. कोरोना काळात तर बायजूजने उत्तुंग भरारी घेतली. भारतीय जनतेला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण क्षेत्रात सुरु असलेला हा प्रयोग तुफान आवडला.

दिव्याच्या आयुष्याला 21 व्या वर्षी टर्निंग पॉईंट मिळाला. तिचे वडील अपोलो हॉस्पिटलमध्ये मूत्रविकारतज्ज्ञ तर आई दूरदर्शनवर कार्यक्रम संचालिका म्हणून काम पाहत. त्यामुळे घरातच शिक्षणाचे वातावरण होते. दिव्या यांना विज्ञानाची आवड होती. तिने बंगळुरुच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बायोटेक्नॉलॉजीत पदवी मिळवली. त्यानंतर 2007 मध्ये बायजूजचे रवींद्रन यांच्याशी ओळख आणि पुढील वर्षी लग्न केले.

धडे बोलू लागले तर, या संकल्पनेवर आधारीत ॲप बायजूजने 2015 साली सुरु केले. त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग सुरु केला. कोरोनाच्या महामारीत त्यांच्या या प्रयोगाचे प्रचंड कौतुक झाले. गणित, इंग्रजी, विज्ञान यांची भीती दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मुलांच्या आकलन क्षमता वाढविण्यासाठी अभिनव प्रयोगावर भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांची रुची वाढली. त्यांना धड्यांचे नीट आकलन झाले. कोरोना काळात कित्येक पटीत बायजूजचे सक्रीय सदस्य वाढले. आज हा एक ब्रँड आहे.

कोटक हुरुनच्या सर्वेक्षणानुसार, दिव्या गोकुळनाथ या भारतातील श्रीमंत महिला स्टार्टअप संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4,550 कोटी रुपये इतकी आहे. बायजूजचा बाजारातील वाटा सध्या 23 अब्ज डॉलर्स इतका आहे. आता ऑफलाईन शाळा सुरु झाल्या असल्या तरी शिक्षणात गोड निर्माण करणारी बायजूजची चळवळ निम शहरात आणि ग्रामीण भागातही जोर धरत आहे. त्याअनुषंगाने बायजूजच नवनवीन ऑफर्स आणत आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.