E20 Petrol: पेट्रोलमुळे साखर ‘कडू’? ग्राहकांना दरवाढीचे चटके, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणार?
E20 Petrol sugar price hike: इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगावर आणि पर्यायाने बाजारपेठेवर मोठे संकट आले आहे. ग्राहकांना ऐन सणासुदीत महागाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पेट्रोलमुळे ग्राहकांसाठी यंदा साखर कडू होणार आहे. साखर दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

साखरेच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिशावर बोजा पडण्याची शक्यता आहे.साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामागे पेट्रोलसाठी इथेनॉल निर्मितीचा प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. सरकार आगामी ऑक्टोबर हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर मर्यादित करण्याची शक्यता आहे. आगामी हंगामात साखरेचे उत्पादनात वाढ आणि साखरेच्या रेकॉर्डस्तरावरील किंमती जमिनीवर आणणे हे सरकारचे पहिले उद्दिष्ट असल्याची माहिती सरकार आणि या उद्योग जगतातील सूत्रांनी दिली.
ऊस उत्पादनात घट
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात जून महिन्यात पावसाची मोठी तूट होती. देशात हे दोन्ही राज्य ऊस उत्पादनात मोठा वाटा उचलतात. पावसाने गणित बिघडवल्याने साखर उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यातच इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर वाढला. त्याने साखर उत्पादनाला झटका बसला. आता साखरेचे उत्पादन वाढवणे आणि इथेनॉल ऐवजी साखर निर्मितीला प्राधान्य दिल्यास बाजारात साखरेची आवक वाढेल आणि पर्यायाने किंमती कमी होतील. देशाला बाहेरून साखर आयात करण्याची गरज भासणार नाही.
इथेनॉलने खेळ बिघडवला
सप्टेंबरच्या हंगामात साखर कारखान्यांनी जवळपास 30 लाख मॅट्रिक टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली. एकूण साखर उत्पादनाच्या हे प्रमाण 10 टक्के इतके आहे. जर पुढील हंगामात हे प्रमाण अजून घटवले गेले. तर बाजारात अतिरिक्त जवळपास 30 लाख मॅट्रिक टन साखर येईल आणि पर्यायाने किंमती कमी होतील.
गेल्या एका महिन्यात साखरेच्या किंमतीत जवळपास 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. रेकॉर्डब्रेक दरवाढीने ग्राहक हादरला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महागल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती अत्यंत कमी करून साखकर उत्पादनावर भर देण्यास सांगण्यात येऊ शकते. ऊसाला पर्याय म्हणून मक्का आणि तांदळापासून पेट्रोल निर्मितीवर भर दिला जाऊ शकतो.
राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी वाढण्याची शक्यता
गेल्या महिन्यापासून सातत्याने वाढत असलेल्या साखरेच्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पुरते बिघडवले आहे. यंदा साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी कारखान्यांमधून मिळणाऱ्या साखरेच्या दरात मोठी पाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेने पन्नाशी ओलांडली आहे. आगामी दसरा आणि दिवाळीपूर्वी नवीन साखर बाजारात आली नाही, तर दर आणखी भडकण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे
एपीएमसीत येणाऱ्या साखरेचा मुंबईसह उपनगरांमध्ये दरमहा जवळपास ४० हजार टन वापर होतो. यापैकी सुमारे ६० टक्के साखरेचा वापर मिठाई, बेकरी, पेये आणि इतर मिश्रित उत्पादनांसाठी केला जातो. तर, उर्वरित ४० टक्के साखर घरगुती वापरासाठी विकली जाते. त्यामुळे साखरेच्या दरातील वाढीचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांवरच नव्हे, तर साखरेपासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांवरही होण्याची शक्यता आहे. राज्यात मागील वर्षी ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.