Post Office ची धमाकेदार योजना! 1 लाखांच्या गुंतवणुकीवर व्याजातून कराल बक्कळ कमाई, वाचा सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) आपल्या वृद्धावस्थेसाठी अत्यंत फायदेशीर स्कीम आणत आहे.

Post Office ची धमाकेदार योजना! 1 लाखांच्या गुंतवणुकीवर व्याजातून कराल बक्कळ कमाई, वाचा सविस्तर
Post Office Savings Account

नवी दिल्ली : जर तुम्ही एखादे काम करत असाल तर भविष्य सुरक्षित ठेवणं खूप महत्वाचं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) आपल्या वृद्धावस्थेसाठी अत्यंत फायदेशीर स्कीम आणत आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यात मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक भाग तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा बचत योजनेबद्दल सांगणार आहोत, जी पेन्शन सिस्टम प्रमाणेच आहे. यामध्ये तुम्हाला दर तीन महिन्यांनी निश्चित परतावा मिळतो. (earn money invest 1 lakh in post office senior citizen savings scheme get 37000 as interest income)

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूक करण्यास सुरू केल्यापासून तीन महिन्यांनंतर तुम्हाला परतावा मिळू लागतो. पोस्ट ऑफिसच्या या अप्रतिम योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास उत्कृष्ट व्याज दर देखील मिळतो. चालू आर्थिक वर्षासाठी या योजनेतील गुंतवणूकीवरील व्याज दर वार्षिक 7.4 टक्के आहे. 31st March/30th June/30th Sept/31st December रोजी दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते.

तुमच्या खात्यात ही रक्कम ऑयो जमा होते. या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेची परिपक्वता 5 वर्षे आहे, जी 8 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

अलीकडे बर्‍याच बँकांमध्ये अडचणी वाढल्या आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवीची चिंता सतावतेय. पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिटमध्ये पैसे पूर्णतः सुरक्षित असतात. या खात्याचे नाव पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाऊंट (TD) असे आहे. आपण पोस्ट ऑफिसमध्ये अवघ्या 1000 रुपयांत टाईम डिपॉझिट खाते उघडू शकता. यासाठी आपल्याला जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही, तर फक्त 500 रुपयांमध्ये आपण पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडू शकता.

योजना काय आहे?

पोस्ट ऑफिसमध्ये एफडीवर 1 ते 3 वर्षासाठी 5.5% आणि 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.7% व्याज मिळेल. हे व्याज तिमाही आधारावर मोजले जाते आणि दरवर्षी ते दिले जाते.

मुलाचे खाते देखील उघडता येते

तसेच पालक आपल्या मुलांच्या नावे खाते उघडू शकतात. परंतु जर मूल 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल तर ते स्वत: खाते देखील हाताळू शकते. याशिवाय या योजनेंतर्गत आपल्याला पाहिजे तितकी खाती उघडता येतात.

संयुक्त खात्याची सुविधा

या योजनेंतर्गत आपण केवळ एकल खाते उघडू शकत नाही, तर संयुक्त खाते उघडण्याची सुविधा देखील आहे. तसेच आपल्या इच्छेनुसार संयुक्त खाते एकल खात्यात रुपांतरित देखील करू शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

पोस्ट ऑफिसचे पाच वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) 6.8% परतावा देते. त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80 सी अंतर्गत कराची सूट देखील मिळते. त्यात केलेल्या गुंतवणुकीवर 5 वर्षांचा लॉकइन कालावधी असतो, म्हणजेच आपण 5 वर्षांपूर्वी त्यामधून पैसे काढू शकत नाही.

124 महिन्यांत पैसे दुप्पट

याशिवाय आपण किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास ही रक्कम 124 महिन्यांत दुप्पट होते. दुसर्‍या तिमाहीत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत हे व्याजदर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिने म्हणजेच 10 वर्षे 4 महिने आहे. (earn money invest 1 lakh in post office senior citizen savings scheme get 37000 as interest income)

संबंधित बातम्या – 

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, अजित पवार म्हणतात, नोटा छापण्याचा अधिकार केंद्राला, राज्याला नाही!

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महागलं, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर?

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुविधेद्वारे त्वरित पाठवा पैसे; झटपट जाणून घ्या सर्वकाही

(earn money invest 1 lakh in post office senior citizen savings scheme get 37000 as interest income)

Published On - 12:06 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI