पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, अजित पवार म्हणतात, नोटा छापण्याचा अधिकार केंद्राला, राज्याला नाही!

Fuel price hike today : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठाकरे सरकारला राज्यातील कर कपात करण्याचा सल्ला देत आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, अजित पवार म्हणतात, नोटा छापण्याचा अधिकार केंद्राला, राज्याला नाही!
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 11:23 AM

मुंबई : पाच राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel rate today) दर स्थिर असल्याचं चित्र आहे. मात्र दर जरी स्थिर असले तरी ते सर्वसामान्य वाहनचालकांना न परवडणारेच आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman), आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांच्यापासून ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यापर्यंत सर्वांनी वाढत्या इंधन दरावरुन चिंता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकारही केंद्राकडे बोट दाखवत आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठाकरे सरकारला राज्यातील कर कपात करण्याचा सल्ला देत आहेत. (Fuel price hike Maharashtra DCM Ajit Pawar said center should take down taxes on Petrol Diesel price today )

नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झालं. यावेळी अजित पवारांनी वाढत्या पेट्रोल-डिझेल दरावरही भाष्य केलं. केंद्रानं पेट्रोल डिझेलचे दर कमी केले तर सरकारही त्याला पाठिंबा देईल, असं अजित पवार म्हणाले. केंद्राने पेट्रोल डिझेलवर मोठ्या प्रमाणावर कर लावले आहेत. केंद्राला नोटा छापण्याचा अधिकार आहे, राज्याला नाही. केंद्राने दर कमी करावे, राज्य सरकार त्याला पाठिंबा देईल, असं अजित पवार यांनी नमूद केलं. 15 लाखांचं आश्वासन कुणी दिलं होतं? ते पाळलं का? चुनावी जुमला म्हणे, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टोलेबाजी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पात दिलासा नाहीच

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाईल अशी आशा होती. मात्र 8 मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकसल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस कमीच केले नाहीत. परिणामी पेट्रोल डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत.

राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या  फडणवीस सरकारने 2018 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे. राज्य सरकार व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारत आहे. यातील सेस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता होती. मात्र हा सेस अद्याप कमीच केलेला नाही.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते…?

दरम्यान, राज्य सरकारने इंधनावरील दर कमी करुन राज्यातील दिलासा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरुन त्यांनी हल्लाबोल केला होता. “सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत.”

पेट्रोल-डिझेल GST कार्यक्षेत्रात आणण्याची मागणी

दरम्यान, पेट्रोल-डिझेल GST च्या कार्यक्षेत्रात आणण्याची मागणी होत आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्याबाबत प्रस्तावही दिला आहे. GST मुळे राज्यांना महसुलात फटका बसत आहे. मात्र पेट्रोल-डिझेल GST च्या कार्यक्षेत्रात नाही.

संबंधित बातम्या     

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महागलं, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर?

फडणवीसांनी लावलेला सेस अजूनही कायम, पेट्रोल-डिझेलबाबत ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार?

पेट्रोल डिझेल भाववाढीवरुन अजित पवार भडकले, ‘पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा”

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.