8 वर्षांची प्रतिक्षा फळाला! sovereign gold bond मधून तगडा परतावा

Gold Bond Scheme | सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. या योजनेला 8 वर्षे पूर्ण होत आहे. 30 नोव्हेंबर रोजी कालावधी पूर्ण होत आहे. SGB 2015-I गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुवर्ण रोखे 2,684 रुपये प्रति ग्रॅम या दराने 26 नोव्हेंबर 2015 रोजी खरेदी करता आले होते.

8 वर्षांची प्रतिक्षा फळाला! sovereign gold bond मधून तगडा परतावा
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 10:58 AM

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : सरकारी सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला आता 8 वर्षे पूर्ण होत आहे. दोन दिवसांनी गुंतवणूकदारांना सोन्यावाणी परतावा मिळेल. 26 नोव्हेंबर 2015 रोजी सुवर्ण रोखे 2,684 रुपये प्रति ग्रॅम या दराने बाजारात खरेदी करता आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिसूचना काढली. त्यानुसार, ग्राहकांना प्रति युनिट 6,132 रुपये किंमत मिळेल. नोव्हेंबर 20-24, 2023 या दरम्यानची किंमत त्यासाठी गृहीत धरण्यात आली आहे. या दराने या मालिकेत गुंतवणूक करणाऱ्यांना 125 ते 128% या दरम्यान परतावा मिळेल. या गुंतवणुकीवर व्याज पण मिळणार आहे. वार्षिक 2.5 टक्के दराने हे व्याज गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल. रिझर्व्ह बँकेने भारत सरकारच्या आदेशाने हे सुवर्ण रोखे बाजारात आणले होते.

ग्राहकांकडून मोठी गुंतवणूक

RBI नुसार, पहिल्या मालिकेतील सुवर्ण रोखे योजनेत 9,13,571 युनिट (0.91 टन सोने) विक्री झाले होते. सॉवरेन गोल्ड बाँडच्या सुरुवातीच्या 9 मालिकांसाठी योजनेतून बाहेर पडण्यासाठी एक किंमत गृहित धरण्यात आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोन्याचा बाजारातील किंमती आधारे त्यावर परतावा मिळेल. या योजनेतील पहिली मालिका 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे रिडम्पश्न प्राईस 20-24 नोव्हेंबर या काळातील बंद भावाची सरासरी गृहित धरण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कधी सुरु झाली योजना

नरेंद्र मोदी सरकार 2014 साली केंद्रात आले. त्यावेळी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणण्याचे निश्चित झाले. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली. दरवर्षी ही सुवर्णसंधी मिळते. गोल्ड बाँडचा कालावधी आठ वर्षांसाठी आहे. या मालिकेतून मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी 15 एप्रिल, 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

डिजिटल गोल्ड बाँड

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍यांना 50 रुपयांची सवलत मिळते.

2.5% व्याजाचा मिळेल लाभ

सोन्याचा भाव वाढल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सोन्याचा भाव वाढतच चालला आहे. वार्षिक आधारावर त्याला 2.75 टक्क्यांचे व्याज पण मिळेल. प्रति ग्रॅम ही रक्कम 36.91 प्रति सहा महिने, तर या 8 वर्षात एक युनिट, 1 ग्रॅमवर 590.48 रुपयांचा फायदा होईल. या मालिकेतील गोल्ड बाँडवर सप्टेंबर 2016 नंतर व्याजदर घटले आहे. 2.75 टक्क्याऐवजी 2.5 टक्के व्याज मिळेल.

अशी करा खरेदी

या योजनेतंर्गत स्वस्त सोने तुम्हाला स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचे (Stock Exchanges), NSE आणि BSE येथून खरेदी करता येईल. डीमॅट खात्यातून या योजनेत गुंतवणूक करता येते.

असे मिळतात फायदे

  • फिजिकल गोल्डमधील गुंतवणुकीची झंझट नाही
  • सोन्याच्या चोरीपासून होईल सूटका
  • सोने घरात सुरक्षित ठेवण्याची चिंता नाही
  • एसेट मॅनेजमेंट फीस लागत नाही
  • केंद्र सरकारच बाँडवर 2.5 टक्के व्याज देते
  • या गुंतवणुकीवर कर सवलत देण्यात येते
  • या गुंतवणुकीतील परतावा, मॅच्युरिटीपर्यंत कर मुक्त
  • दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.