AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सप्टेंबरच्या तिमाहीत आर्थिक वाढ 7.7 टक्के असणार; ICRA म्हणते…

अदिती नायर म्हणाल्या की, भारतीय शेअर बाजारात सातत्याने वाढ, प्रत्यक्ष कर संकलनात मजबूत वाढ आणि व्यावसायिक भावनांमध्ये सुधारणा यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढीची चिन्हे दर्शविते. यापूर्वी जागतिक बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षात 8.3 टक्के आणि रेटिंग एजन्सी मूडीजचा 9.3 टक्के दराने आर्थिक वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.

सप्टेंबरच्या तिमाहीत आर्थिक वाढ 7.7 टक्के असणार; ICRA म्हणते...
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 7:51 PM
Share

नवी दिल्ली : सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत भारताची आर्थिक वाढ 7.7 टक्के असू शकते, अशी माहिती रेटिंग एजन्सी ICRA ने दिलीय. कोरोना साथीच्या आधी अर्थव्यवस्थेने 14 निर्देशाकांपैकी निम्मे स्तर गाठलेत. अशा स्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग येण्याची शक्यता आहे. एप्रिल-जून 2021 मध्ये अर्थव्यवस्था विक्रमी 20.1% वाढली. इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे येणाऱ्या अडचणी कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास वाढला.

‘भारतीय अर्थव्यवस्था वाढीची चिन्हे’

अदिती नायर म्हणाल्या की, भारतीय शेअर बाजारात सातत्याने वाढ, प्रत्यक्ष कर संकलनात मजबूत वाढ आणि व्यावसायिक भावनांमध्ये सुधारणा यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढीची चिन्हे दर्शविते. यापूर्वी जागतिक बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षात 8.3 टक्के आणि रेटिंग एजन्सी मूडीजचा 9.3 टक्के दराने आर्थिक वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) हा आकडा 9.5 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. इक्राने म्हटले की, दुसऱ्या तिमाहीत पुरवठ्यातील अडचणी आणि अतिवृष्टीमुळे वार्षिक आधारावर आर्थिक वाढ प्रभावित झाली.

‘पेट्रोलची विक्री कोविडपूर्व पातळीवर पोहोचली’

इक्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ नायर म्हणाले की, कोरोना लसीच्या पहिल्या डोसच्या संख्येच्या आधारावर, देशातील 60-65 टक्के प्रौढांना या वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे लसीकरण अपेक्षित आहे. हा दर सध्या सुमारे 30 टक्के आहे. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात, सरकारी पेट्रोलियम रिफायनरी कंपन्यांची पेट्रोलची विक्री कोरोनाच्या आधीच्या पातळीपेक्षा जास्त झाली. मात्र, डिझेलची विक्री कमी झाली. दोन्ही प्रमुख इंधनांच्या किमती अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्यात.

FM सीतारामन यांचा दोन अंकी वाढीचा दावा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, देश चालू आर्थिक वर्षात जीडीपीच्या दोन अंकी वाढीकडे वाटचाल करीत आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये देशाची आर्थिक वाढ 8.5 टक्क्यांपर्यंत असेल. पुढील दशकभर हा आर्थिक विकासदर कायम राहील, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, वित्त मंत्रालयाने वाढीच्या आकड्यांबाबत अद्याप कोणतेही मूल्यांकन केलेले नाही.

संबंधित बातम्या

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये फोटो चांगला दिसत नाही, असा करा अपडेट, संपूर्ण प्रक्रिया काय?

Gold Rate Today : सोने विक्रमी स्तरापासून अजूनही 9697 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

Economic growth will be 7.7 percent in the September quarter; ICRA says

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.