Electric Vehicle : ईव्ही तर देशाचं भाग्यच बदलणार! नोकऱ्यांची अशी लाट येणार

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहन बाजार देशाचं नशीबच पालटणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास तर थांबणारच आहे, पण देशात आपण अंदाज ही व्यक्त केला नसेल इतक्या नोकऱ्या निर्माण होणार आहे.

Electric Vehicle : ईव्ही तर देशाचं भाग्यच बदलणार! नोकऱ्यांची अशी लाट येणार
नोकऱ्यांचा पाऊस
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 7:20 PM

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये (Automobile Sector) आता मोठे बदल होण्याची चिन्हं आहेत. येत्या 5 ते 7 वर्षात भारतात इलेक्ट्रिक दुचाकीचीच विक्री होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात जगातील सर्वात मोठे हब होण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलला (Electric Vehicle) देशात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजार देशाचं नशीबच पालटणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास तर थांबणारच आहे, पण देशात आपण अंदाज ही व्यक्त केला नसेल इतक्या नोकऱ्या निर्माण होणार आहे.

अर्थव्यवस्था मजबूत होणार कच्च्या तेलावरील (Crude Oil) भार कमी करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. भारताची मोठी गंगाजळी त्याकामी खर्ची पडत आहे. सरकारला हे चलन वाचवायचंय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) दिवसागणिक अवाक्या बाहेर जात आहेत. त्याचा संपूर्ण बाजारपेठेवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्थेवरील इंधनाचा परिणाम कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमध्ये बुमिंग येणार आहे. सरकारच्या प्रोत्साहनामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेल कारऐवजी इलेक्ट्रिक वाहने लवकरच धावू लागतील.

इतकी वाहनं रस्त्यावर 2030 मध्ये तब्बल 5 कोटी इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर असतील, असा अंदाज याविषयीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे येत्या 8 वर्षात वाहनांची संख्या कित्येक पटीने वाढणार आहे. सध्या देशात 1700 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत. ही संख्या अत्यंत तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. ही स्टेशन वाढल्यानंतर वाहन चालकांना फारवेळ चार्जिंगसाठी थांबावं लागणार नाही. आतापासूनच सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच जागोजागी चार्जिंग स्टेशन दिसतील.

हे सुद्धा वाचा

सरकारचे उद्दिष्ट काय बिझनेस चेंबर फिक्कीने (FICCI) इलेक्ट्रिक मोबॅलिटी कार्यक्रम घेतला. पीएमओचे सल्लागार तरुण कपूर यांनी आधुनिक युगाची इलेक्ट्रिक वाहनं गरज असल्याचे सांगितले. केंद्र सरकार त्यासाठी प्रोत्साहन देणारं असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार जास्तीत जास्त इलेक्ट्रिक कार, बस आणि दुचाकी रस्त्यावर आणण्याच्या तयारीत असल्यचे कपूर यांनी स्पष्ट केले. येत्या 5 ते 7 वर्षांमध्ये 100 टक्के इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेऊन येण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

इतके कोटी रोजगारांची निर्मिती इलेक्ट्रिक मोबॅलिटीसंदर्भात फिक्की-यस बँकेने एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, 2030 पर्यंत देशात 1 कोटी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. अहवालानुसार, 2047 पर्यंत 87 टक्के विक्री होणऱ्या नवीन वाहनं ही इलेक्ट्रिक असतील. यामध्ये 90 टक्के टू-व्हीलर, 79 टक्के कार, 92 टक्के थ्री-व्हीलर आणि 67 टक्के बस असतील.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.