AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk Twitter: पराग अग्रवालला ट्विटरच्या CEO पदावरुन हटवण्याच्या तयारीत! कोण असेल नवा CEO?

मस्क यांनी यापूर्वी म्हटले आहे की, ते ट्विटरच्या व्यवस्थापनावर खूश नाहीत. अशा परिस्थितीत मस्क येताच पराग अग्रवाल ट्विटर सोडणार असल्याचे मानले जात होते. तर जॅक डोर्सी गेल्यानंतर पराग यांना पाच महिन्यांपूर्वी ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले होते.

Elon Musk Twitter: पराग अग्रवालला ट्विटरच्या CEO पदावरुन हटवण्याच्या तयारीत! कोण असेल नवा CEO?
एलन मस्कImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: May 08, 2022 | 2:40 PM
Share

नवी दिल्ली : एलन मस्क (Alan Musk) यांनी ट्विटरला (Twitter) 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची घोषणा केली. सध्या ते हा निधी उभारण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. अलीकडेच, अशी बातमी आली होती की, 18 गुंतवणूकदारांच्या मदतीने त्यांनी $7 बिलियनचा निधी उभारला आहे. याच्या मदतीने ते आता वैयक्तिक स्तरावर $27 अब्ज रोख जमा करतील. पण मस्क हे ट्विटरच्या व्यवस्थापनावर खूश नाहीत, असे त्यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत एलन मस्क पराग अग्रवाल (CEO Parag Agarwal) यांना ट्विटरच्या CEO पदावरून हटवण्याच्या तयारीत असल्याचेही कळत आहे. मात्र एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या $7 बिलियन फंड रेझिंगमध्ये परागची पत्नी विनिता अग्रवाल (Vinita Agarwal) ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीचे नाव देखील यात समाविष्ट आहे. विनिता अग्रवाल अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म अँडरसन हॉरोविट्झमध्ये जनरल पार्टनर म्हणून काम करतात. ही अमेरिकेतील शीर्ष उद्यम भांडवल फर्मपैकी एक आहे. ही कंपनी स्टार्ट-अप तसेच प्रस्थापित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. अँडरसन हॉरोविट्झने इलॉन मस्कला $400 दशलक्ष म्हणजे सुमारे 3000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे अँडरसन हॉरोविट्झ हे इलॉन मस्कसोबत ट्विटरचे नवे प्रवर्तकही असतील.

अँडरसन होरोविट्झ ही उद्यम भांडवल कंपन्यांपैकी एक आहे. ज्यानी Facebook ला सुरुवातीपासूनच आर्थिक पाठबळ दिले. या डीलबाबत कंपनीचे सह-संस्थापक बेन होरोविट्झ म्हणाले की, एलन मस्क ही जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे जी केवळ ट्विटरची समस्या सोडवू शकत नाही, तर आपली ओळख मजबूत करू शकते.

ट्विटरच्या व्यवस्थापनावर मस्क ना खूश

तसे, मस्क यांनी यापूर्वी म्हटले आहे की, ते ट्विटरच्या व्यवस्थापनावर खूश नाहीत. अशा परिस्थितीत मस्क येताच पराग अग्रवाल ट्विटर सोडणार असल्याचे मानले जात होते. तर जॅक डोर्सी गेल्यानंतर पराग यांना पाच महिन्यांपूर्वी ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले होते.

अनियमिततेचा आरोप

अँडरसन होरोविट्झ यांनी फार पूर्वी फेसबुकला निधी दिला. मात्र, कंपनीवर अनेक आरोप झाले आहेत. अँडरसन होरोविट्झने ऑक्युलस व्हीआर सारख्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली, जी नंतर मेटा म्हणजेच फेसबुकने विकत घेतली. या करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. कंपनी सध्या या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचे काम करत आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?