AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ELSS Return : कर बचत तर होईलच मित्रा, कमाईचे पारडे असेल जड, मार्च वाट पाहता कशाला, योजनेत केव्हाही करा SIP सुरु

ELSS Return : या योजनेत कर सवलत तर मिळेलच पण कमाईचे पारडे पण राहील जड

ELSS Return : कर बचत तर होईलच मित्रा, कमाईचे पारडे असेल जड, मार्च वाट पाहता कशाला, योजनेत केव्हाही करा SIP सुरु
| Updated on: Jan 08, 2023 | 10:09 PM
Share

नवी दिल्ली : नवीन वर्षांत अनेकांनी गुंतवणुकीचा (Investment) संकल्प सोडला असेल. त्यांचा बचत (Saving), फायदा (Benefit) आणि कर सवलत (Tax Exemption) असा तिहेरी फायदा असणारी योजना हवी आहे. त्यासाठी ते गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा तिहेरी फायदा देणारा पर्याय आहे. गुंतवणूकदारांना जोरदार परतावा, कर सवलत आणि बचत या गोष्टी या योजनेत मिळतात.

ELSS Mutual Fund मध्ये इनकम कायद्याच्या कलम 80C अतंर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळेत. जोरदार परतावा मिळतो. या योजनेत लॉक इन पिरियड पण इतर कर सवलत (Small Savings) योजनांपेक्षा कमी आहे. मुदत ठेव वा NSC तुलनेत 5 वर्षात 3 ते 4 पटीत परतावा जास्त मिळतो.

BNP Fincap चे संचालक ए. के. निगम यांनी मत व्यक्त केले आहे. त्यानुसार, शेअर बाजारात थोडी रिस्क घेण्याची सवय असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. ही इक्विटी लिंक्ड योजना आहे. त्यामुळे जोखीम अधिक आहे.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) योजनेत लॉक इन पिरियड 3 वर्षे आहे. तर कर बचत मुदत ठेव योजनेत 5 वर्षे लॉक इन पिरियड आहे. त्यामुळे ELSS मध्ये एफडीपेक्षा कमी कालावधी आहे. या योजनेत 1 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

तर ज्या मुदत ठेव योजनेत आयकर कायदा कलम 80C अंतर्गत एक ठराविक रक्कमेवर सवलत मिळते. पण संपूर्ण रक्कम मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यावर तुम्हाला कर द्यावा लागतो. त्यामुळे ELSS योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केव्हाही SIP सुरु करता येते.

ELSS मध्ये इनकम टॅक्स अॅक्ट सेक्‍शन 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. ELSS मध्ये 3 वर्षांसाठी लॉक-इन पीरियड असतो. ELSS वर 1 लाख रुपयांपर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर कर सवलत मिळते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?