AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC News : आयुष्याची संध्याकाळ घालवा मजेत, दर महिना 12000 पेन्शन, एलआयसीच्या या योजनेत एकदाच गुंतवा पैसा

LIC Saral Pension Plan News : एलआयसीकडे ग्राहकांसाठी खूप चांगल्या योजना आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व श्रेणीतील पॉलिसी एलआयसीकडे आहे. एलआयसी सरल पेन्शन प्लॅन अशीच एक एलआयसीची योजना आहे.

LIC News : आयुष्याची संध्याकाळ घालवा मजेत, दर महिना 12000 पेन्शन, एलआयसीच्या या योजनेत एकदाच गुंतवा पैसा
आयुष्याची संध्याकाळ घालवा मजेतImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 10, 2022 | 2:36 PM
Share

आयुष्याची संध्याकाळ सुखात, आनंदात आणि कुटुंबियासोबत घालवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यासाठी आपण चांगल्या गुंतवणूक योजनेच्या(Best Investment Scheme) सतत शोधात असतो. म्हणजे आतापासूनच रक्कम गुंतवायची आणि उतारवयात (In old age)त्याचा फायदा घ्यायचा. गुंतवणूकीसाठी अजूनही नागरीक भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation) विविध योजनांवर विश्वास ठेवतात. सुरक्षित गुंतवणूक आणि गुंतवलेल्या रक्कमेवर मिळणारा उत्तम परतावा ही त्यामागील कारणे आहेत. त्यामुळे या योजना भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी चांगल्या योजना राबविते. यामध्ये मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व योजनांचा समावेश आहे. एलआयसीची अशीच एक चांगली योजना, जीचे नाव एलआयसी सरळ पेन्शन प्लॅन (LIC Saral Pension Plan) असे आहे. या योजनेत तुमच्या गुंतवणूकीनंतर तुम्हाला निवृत्ती योजनेसारखी एक खास रक्कम दर महिन्याला मिळते.

एकरक्कमी हप्ता

एलआयसीच्या या पॉलिसीत एकरक्कमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला उतारवायत पेन्शन मिळते. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला गुंतवणूकीची रक्कम परत करण्यात येते. या योजनेत 40 वर्ष ते 80 वर्षांदरम्यानच्या व्यक्ती गुंतवणूक करु शकतात. या योजनेत एकाला अथवा पती-पत्नीला संयुक्तरित्या खाते उघडता येते. दोघांनाही गुंतवणूक करता येते. पॉलिसीधारकाला ही योजनेत गुंतवणूक केल्यापासून सहा महिन्यानंतर पॉलिसी सरेंडर करण्याची सोय उपलब्ध आहे.

जर एखादी व्यक्ती नुकताच सेवामुक्त झाला असेल. तर त्याला पीएफ फंडातील रक्कम आणि ग्रॅज्युअटी रक्कमेचा पैसा या पॉलिसीत गुंतवता येतो. तो एकदाच या पॉलिसीत एकरक्कमी गुंतवणूक करु शकतो. एलआयसी कॅलक्युटरच्या हिशोबाप्रमाणे जर एखाद्या 42 वर्षांच्या व्यक्तीने 30 लाख रुपयांची एकरक्कमी गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला 12,388 रुपये दर महिन्याला पेन्शन मिळेल.

कर्ज सुविधाही उपलब्ध

या योजनेत कमीत कमी दर वर्षाला 12,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत कमाल गुंतवणूकीची कसलीही मर्यादा देण्यात आलेली नाही. या योजनेतच तुम्हाला महिन्याला, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक अशाप्रकारे निवृत्तीवेतन घेता येते. सोबतच या पॉलिसीतंर्गत तुम्हाला कर्ज सुविधा ही घेता येते. सरल पेन्शन योजनेतंर्गत पॉलिसीधारकाला सहा महिन्यानंतर कर्ज सुविधी उपलब्ध होते.

जीवन लाभ ही लाभदायक

एलआयसीची सर्वाधिक विक्री होणा-या योजनेचे नाव आहे, जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy). या योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचा फायदा देण्यात येतो. हा फायदा बोनस रुपात मिळतो. यामध्ये पहिला बोनस हा पहिला पुनरावृत्ती (Revisionary) बोनस दिल्या जातो. तर शेवटचा बोनस हा अतिरिक्त (Additional) बोनस असतो. ग्राहकांना वेळेनुसार, दोन्ही बोनसचे फायदे देण्यात येतात. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकाला कसा फायदा देण्यात येतो, याविषयी जाणून घेतानाच या पॉलिसीचे वैशिष्टये ही समजून घेऊयात.या पॉलिसीचे वैशिष्ट्ये म्हणजे दरमहा 794 रुपयांचा प्रिमियम भरुन विमाधारकाला (Policyholder) कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 5.25 लाख रुपये मिळू शकतात. यासोबतच या योजनेच्या कालावधी दरम्यान ग्राहकाला विमा संरक्षण कवच ही मिळते. ही पॉलिसी 8 वर्षाच्या मुलापासून ते अधिकत्तम 50 वर्षांच्या व्यक्तीला घेता येते. अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे, या पॉलिसीवर ग्राहकाला कर्ज सुविधा ही मिळते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.