महिन्याला जमा करा 794 रुपये आणि मॅच्युरिटीपूर्वीच व्हा लखपती आणि पैसे ही भरावे लागतील कमी

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये कमीतकमी एकूण विमा रक्कम 2 लाख रुपयांची तर अधिकत्तम विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. ही एक मर्यादीत प्रिमियम पॉलिसी आहे. ज्यात पॉलिसी कालावधीपेक्षा कमी रक्कम जमा करुन लखपती होता येते.

महिन्याला जमा करा 794 रुपये आणि मॅच्युरिटीपूर्वीच व्हा लखपती आणि पैसे ही भरावे लागतील कमी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 1:59 PM

आज आपण एलआयसीची सर्वाधिक विक्री होणा-या जीवन विमा योजनेविषयी (Life Insurance Policy), या योजनेचे नाव आहे, जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy). या योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचा फायदा देण्यात येतो. हा फायदा बोनस रुपात मिळतो. यामध्ये पहिला बोनस हा पहिला पुनरावृत्ती (Revisionary) बोनस दिल्या जातो. तर शेवटचा बोनस हा अतिरिक्त (Additional) बोनस असतो. ग्राहकांना वेळेनुसार, दोन्ही बोनसचे फायदे देण्यात येतात. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकाला कसा फायदा देण्यात येतो, याविषयी जाणून घेतानाच या पॉलिसीचे वैशिष्टये ही समजून घेऊयात.या पॉलिसीचे वैशिष्ट्ये म्हणजे दरमहा 794 रुपयांचा प्रिमियम भरुन विमाधारकाला (Policyholder) कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 5.25 लाख रुपये मिळू शकतात. यासोबतच या योजनेच्या कालावधी दरम्यान ग्राहकाला विमा संरक्षण कवच ही मिळते. ही पॉलिसी 8 वर्षाच्या मुलापासून ते अधिकत्तम 50 वर्षांच्या व्यक्तीला घेता येते. अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे, या पॉलिसीवर ग्राहकाला कर्ज सुविधा ही मिळते.

जीवन लाभ पॉलिसीमध्ये कमीतकमी विमा रक्कम 2 लाख रुपयांची तर अधिकत्तम विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. ही एक मर्यादीत प्रिमियम पॉलिसी आहे. यामध्ये ठराविक कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी रक्कम भरावी लागते. 15 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 21 वर्षांच्या पॉलिसीसाठी 15 वर्षे आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी 16 वर्षांचा हप्ता भरावा लागणार आहे. जर दर महिन्याला 794 रुपयांचा प्रिमियम भरुन दरवर्षी विमाधारकाला 9,340 रुपयांचा हप्ता जमा करता येईल. म्हणजे पूर्ण कालावधीसाठी ग्राहकाला 1,49,045 रुपयांचा प्रिमियम जमा करावा लागणार आहे. जेव्हा पॉलिसीला 25 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा कालावधी पूर्ण होईल.

काय आहेत म्युच्युरिटीचे लाभ

ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक केल्यावर विम्याचे दोन लाख रुपये मिळतील. पुनरावृत्ती बोनसचा फायदा त्याला मिळेल. त्यापोटी 2,35,000 रुपये आणि अंतिम अतिरिक्त बोनसचे 90,000 रुपये मिळतील. म्हणजे विमाधारकाला सर्व रक्कम मिळून एकूण मॅच्युरिटी रक्कम 5,25,000 रुपये मिळतील. म्हणजे विमाधारकाला 1,49,045 रुपयांचा प्रिमियम जमा केल्यावर 5,25,000 रुपये मिळतील.

हे सुद्धा वाचा

विमा संरक्षणाचा काय फायदा मिळेल

आता या योजनेत काय विमा संरक्षण मिळते हे बघुयात. जर ही विमा योजना घेतल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास विमाधारकाच्या वारसदारांना विमा संरक्षणाची रक्कम मिळेल. वारसदाराला विमा पॉलिसीचे दोन लाख रुपये तर मिळतीलच सोबतच त्याला पुनरावृत्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनसची रक्कम मिळले. ही रक्कम पॉलिसीत किती रक्कम जमा करण्यात आली यावर आधारीत असेल. विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज ही काढता येईल.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.