Good News! बजेट आधीच ‘या’ राज्य सरकारने रद्द केला करमणूक कर, सिनेसृष्टीत आनंद

| Updated on: Jan 11, 2021 | 11:50 PM

राज्यातील अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी आणि तरुणांना नव्या संधीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Good News! बजेट आधीच या राज्य सरकारने रद्द केला करमणूक कर, सिनेसृष्टीत आनंद
Follow us on

नवी दिल्ली : देशातल्या एका सरकारने राज्यातील सिनेसृष्टीला मदत करण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या जीवघेण्या काळात सिनेसृष्टीला मोठा आर्थिक फटका बसला. यातून दिलासा देण्यासाठी केरळ सरकारने सिनेमातील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत सर्व प्रकारचे करमणूक कर माफ करण्यात आले आहेत. तसंच गतवर्षी मार्च ते यंदा मार्चपर्यंत वीज शुल्कामध्येही 50 टक्के कपात केली जाणार आहे. राज्यातील अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी आणि तरुणांना नव्या संधीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Entertainment News kerala government waives entertainment tax for cinema theatres)

इलेक्ट्रिक फिक्स चार्जवरही सूट

यासाठी मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये देण्यात आलेल्या निवेदनानुसार, वीजेच्या फिक्स शुल्कावर 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. सिनेमा थिएटरवरील मालमत्ता कर आता मासिक हप्त्यांमध्ये जमा केला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा मालमत्ता कर राज्यातल्या स्थानिक संस्थांकडून आकारला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सिनेमावर व्यावसायिक कराबद्दल अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. तर स्थानिक संस्था, इलेक्ट्रिकल इंस्पेक्टरेट फिल्म, बिल्डिंग फिटनेस, हेल्थ, फायर अनेक विभागांकडून घेतलेल्या परवान्यांची वैधता कालावधी ही 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पिनाराई विजयन यांची घोषणा

फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला ऊर्जामंत्री एमएम मणी, स्थानिक स्वराज्यमंत्री एसी मोईदीन आणि केरळ राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष एनएस पिल्लई उपस्थित होते. केरळ फिल्म असोसिएशनच्या अधिकारी आणि निर्माता अँटनी पेरंबऊर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सिनेसृष्टीतील अनेक समस्यांवर चर्चा केली. या तक्रारी आणि अडथले काळजीपूर्वक हाताळून हिताचा निर्णय घेण्यात येईल असंही आश्वासन त्यांनी दिलं.

लवकरच उघडणार सिनेमा हॉल

राज्यातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी लवकरत सिनेमा हॉल सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांआधीच केरळ सरकारने सिनेमागृहांवरील बंदी उठवली होती. तर 5 जानेवारीपासून 50 टक्के अक्युपेंसी असलेले सिनेमा हॉल सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान, कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Entertainment News kerala government waives entertainment tax for cinema theatres)

संबंधित बातम्या – 

फक्त 9450 रुपयांत फिरा पूर्ण दक्षिण भारत, IRCTC ने जाहीर केलं खास पॅकेज

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात

(Entertainment News kerala government waives entertainment tax for cinema theatres)