फक्त 9450 रुपयांत फिरा पूर्ण दक्षिण भारत, IRCTC ने जाहीर केलं खास पॅकेज

कन्याकुमारी, कांचीपुरम, रामेश्वरम, मदुरई अशी अनेक शहरे आहेत जिथं प्रत्येक वर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात.

फक्त 9450 रुपयांत फिरा पूर्ण दक्षिण भारत, IRCTC ने जाहीर केलं खास पॅकेज

नवी दिल्ली : जेव्हा फिरण्याचा विषय येतो तेव्हा अनेक आपल्या दक्षिण भारत ( DAKSHIN BHARAT YATRA) सहलीला जावसं वाटतं. तसा हा उत्तम पर्याय आहे. कन्याकुमारी, कांचीपुरम, रामेश्वरम, मदुरई अशी अनेक शहरे आहेत जिथं प्रत्येक वर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. यातही भारताच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी हे शेवटचं टोक आहे जिथे सूर्योदय व सूर्यास्ताचं अतिशय मनमोहक दृश्य पाहायला मिळतं. रामेश्वरमची धार्मिक ओळखही प्रत्येकाच्या मनात श्रद्धा जागवते. (tourist news irctc announce bharat darshan special tourist train for south india)

तुम्हीही जर दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीने तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. यासाठी दक्षिण दर्शन पॅकेजची योजना करण्यात आली आहे. ज्यामध्ये कांचीपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुरईसारख्या सुंदर जागी तुम्ही फक्त 9450 रुपयांत प्रवास करू शकता. आयआरसीटीसी तुम्हाला कमी किंमतीत 9 रात्री आणि 10 दिवसांचं हे आकर्षक पॅकेज देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनचंही आयोजन करण्यात आलं आहे. याची अधिक माहिती तुम्ही आयटीआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मिळवू शकता.

खरंतर, कोरोनाच्या या कठीण काळानंतर आता सगळेच जण निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही खास ऑफर नागरिकांसाठी देण्यात आली आहे. दक्षिण भारत फिरण्यासाठी आयआरसीटीसीकडून ही खास ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये फक्त 9450 रुपयांत तुम्ही कांचीपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराईला मनसोक्त फिरण्याचा आनंद घेऊ शकाल.

10 हजारांपेक्षा कमी पैशात फिरा दक्षिण भारत

या खास पॅकेजला दक्षिण भारत यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. ज्याचा ‘NZBD273’ असा कोड आहे. यामध्ये स्लीपर क्लाससाठी 9450 रुपयात तुम्ही तिकीट मिळवू शकता. इतकंच नाही तर यात ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरही तुम्हाला मोफत मिळणार आहे. यासाठीची विशेष ट्रेन गोरखपूरहून 28 जानेवारीला निघणार आहे. तर 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही रिटर्न याल. या ट्रेनमध्ये गोरखपूर व्यतिरिक्त देवरिया सदर, मऊ, वाराणसी, जौनपूर, फैजाबाद, बाराबंकी, लखनऊ, कानपूर आणि झांसी इतं बोर्डिंग / डी-बोर्डिंग सुविधा देण्यात आली आहे. ही गाडी 28 जानेवारीला निघणार असून आणि 30 जानेवारीला कांचीपुरमला पोहचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 2 फेब्रुवारीला ती रामेश्वरमला पोहचेल 3 फेब्रुवारीला ती मदुराईला आणि 6 फेब्रुवारीला ट्रेन परतीच्या मार्गाने गोरखपूरला पोहचेल.

या खास ऑफरमध्ये कोणत्या सुविधा मिळणार?

आयआरसीटीसीने जाहीर केलेल्या या खास ऑफरमध्ये तुम्हाला स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणं, नॉन-एसी हॉल, बसद्वारे इतर सुविधा, नाष्टा, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला बुकिंग रद्द करायची असेल तर त्यासाठी 15 दिवस आधीच ती रद्द करावी लागले. यासाठी 250 रुपये तुमच्या पैशातून कापले जातील. जर तुम्ही 8-14 दिवसांआधी बुकिंग रद्द केली तर 25 टक्के, 4-7 दिवसांआधी तिकीट रद्द केलं तर 50 टक्के आणि 4 दिवसांआधी रद्द केल्यास संपूर्ण पैसे वजा केले जातील. (tourist news irctc announce bharat darshan special tourist train for south india)

संबंधित बातम्या – 

Travel | अवघ्या 1299 रुपयांत हवाई सफर करण्याची शेवटची संधी, पाहा कसे कराल तिकीट बुक?

Indian Railway: रेल्वे विभाग तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार, त्यासाठी ‘हे’ नियम वाचा

(tourist news irctc announce bharat darshan special tourist train for south india)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI