EPFO : वाचवायचे असतील लाखो रुपये तर 31 डिसेंबरपूर्वी करा ‘ईपीएफओ’शी संबंधित ‘हे’ काम…

EPFO ​​डेडलाइनच्या आधी काही महत्त्वाची कामं करा. महिन्याच्या शेवटच्या तारखेला येणार्‍या मुदतींपैकी एक म्हणजे EPFOचं ई-नामांकन. हे काम आत्तापर्यंत प्रलंबित असल्यास आधी ते पूर्ण करा, नाहीतर सात लाख रुपयांपर्यंत नुकसान सहन करावं लागू शकतं.

EPFO : वाचवायचे असतील लाखो रुपये तर 31 डिसेंबरपूर्वी करा 'ईपीएफओ'शी संबंधित 'हे' काम...
EPFO
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 4:58 PM

मुंबई : अका आठवड्यात डिसेंबर महिनाच नाही तर वर्षही संपणार आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू करण्यापूर्वी, लाखोंचं नुकसान वाचावं, असं वाटत असेल तर EPFO ​​डेडलाइनच्या आधी काही महत्त्वाची कामं करा. महिन्याच्या शेवटच्या तारखेला येणार्‍या मुदतींपैकी एक म्हणजे EPFOचं ई-नामांकन. हे काम आत्तापर्यंत प्रलंबित असल्यास आधी ते पूर्ण करा, नाहीतर सात लाख रुपयांपर्यंत नुकसान सहन करावं लागू शकतं.

पीएफ खातेधारकांसाठी ई-नामांकन अनिवार्य ईपीएफओनं आता सर्व पीएफ खातेधारकांना नॉमिनी जोडणं अनिवार्य केलंय. पीएफ खातेधारकांच्या अवलंबितांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हा प्रयत्न आहे. पीएफ खातेधारकांना काही अनुचित प्रकार घडल्यास, आश्रितांना नॉमिनी म्हणून ठेवल्यानं त्यांना विमा आणि पेन्शनसारखं संरक्षण मिळतं. यासाठी EPFO​नं नॉमिनी जोडणं अनिवार्य केलंय.

करू शकता एकापेक्षा जास्त नॉमिनी सर्व पीएफ खातेधारक घरी बसून नॉमिनी जोडण्याचं काम करू शकतात. खातेधारकांना एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्याची मान्यता ईपीएफओ देतं. कोणत्या नॉमिनीला नफ्यात वाटा मिळेल, हे खातेदारदेखील ठरवू शकतो. हे काम ऑनलाइन करता येतं.

नॉमिनी बदलण्याचीही सोय ईपीएफओनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ई-नॉमिनेशनची मोहीम सुरू केली. जर खातेधारकानं नॉमिनी जोडले नाहीत, तर तो त्याच्या पीएफ खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. याशिवाय अशा खातेदारांना सात लाखांच्या विमा संरक्षणाचा लाभही मिळणार नाही. EPFOनं त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ठरवलीय. ईपीएफओनं अशी सुविधाही दिलीय, की खातेदार त्याला पाहिजे तितक्या वेळा नॉमिनी बदलू शकतो.

घरी बसून करा ई-नॉमिनेशन 1: सर्वप्रथम EPFOची अधिकृत वेबसाइट उघडा. 2: आता तुम्हाला UAN आणि पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करावे लागेल. 3: मॅनेज सेक्शनवर जा आणि ई-नॉमिनेशन या लिंकवर क्लिक करा. 4: नॉमिनीचं नाव, फोटो आणि इतर तपशील सबमिट करा. 5: एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्यासाठी, Add New बटणावर क्लिक करा. 6: Save Family Detailsवर क्लिक करताच प्रक्रिया पूर्ण होईल.

Year End Sale : अॅपलच्या प्रॉडक्ट्सवर मिळवा घसघशीत सूट; 69,900 रुपयांना मिळणार iPhone 13!

किम शर्माचा लिएंडर पेस सोबत रोमान्स, Kiss करतानाचा फोटो झाला व्हायरल

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

Non Stop LIVE Update
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.