EPFO News : जुन्या कंपनीतून सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करा PF, वाचा संपूर्ण प्रोसेस

EPFO News : जुन्या कंपनीतून सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करा PF, वाचा संपूर्ण प्रोसेस
पीएफला सरकारचा मोठा दिलासा

जुन्या खात्यातून तुमच्या नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन प्रकिया करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Mar 30, 2021 | 10:15 AM

नवी दिल्ली : जर तुम्हाला तुमच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम (PF) जर तुमच्या नव्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मध्ये पीएफ हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देत आहे. जुन्या खात्यातून तुमच्या नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन प्रकिया करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. (epfo news you can easily transfer amount of your pf from the previous company here is all process)

करा करणार पीएफ ट्रान्सफर?

– सगळ्यात आधी EPFO ला यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. इथे यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.

– लॉगइन केल्यानंतर Online Services वर जा आणि Member-One EPF Account Transfer Request ऑप्शनवर क्लिक करा.

– यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फोर्मेशन आणि पीएफ अकाऊंट वेरिफाय करावं लागेल.

– यानंतर Get Details ऑप्शनवर क्लिक करा.

– आता तुमच्याकडे ऑनलाईन क्लेम फॉर्मची पुष्टी करण्यासाठी मागील नियोक्ता आणि वर्तमान नियोक्ता यांच्या दरम्यान निवड करण्याचा पर्याय असेल. तुम्ही अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित हे निवडले आहे. दोन मालकांपैकी कोणतेही निवडा आणि सभासद आयडी किंवा यूएएन द्या.

– यानंतर सगळ्यात शेवटी Get OTP ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नंतर ओटीपी सबमिट करा.

– ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस रिक्वेस्टसाठी जाईल.

– ही प्रक्रिया पुढच्या तीन दिवसांत पूर्ण होईल. सगळ्यात आधी कंपनी ती हस्तांतरित करेल. तर ईपीएफओचे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

ओटीपी टाकल्यानंतर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेसाठी विनंती केली जाईल. प्रथम कंपनी पैसे हस्तांतरित करेल आणि त्यानंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीवर आपली स्थिती तपासू शकता. ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल. (epfo news you can easily transfer amount of your pf from the previous company here is all process)

संबंधित बातम्या – 

कडाक्याच्या उन्हामुळे Ice Cream कंपन्यांची चांदी, अमूल आणि मदर डेअरी बाजारात आणणार नवे प्रोडक्ट

Bank Holidays : एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे वाचा संपूर्ण लिस्ट

HDFC बँकेचं धमाकेदार होळी गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत मिळणार खास सुविधा

सरकारसोबत पैसे कमावण्याची मोठी संधी! मोफत रजिस्ट्रेशन आणि बक्कळ कमाई

(epfo news you can easily transfer amount of your pf from the previous company here is all process)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें