AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holidays : एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे वाचा संपूर्ण लिस्ट

सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणून, आम्ही एप्रिल 2021 मध्ये शनिवार आणि रविवारी जोडल्यास एकूण 15 दिवस बँका बंद असतील.

Bank Holidays : एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे वाचा संपूर्ण लिस्ट
बँक हॉलिडे
| Edited By: | Updated on: Mar 29, 2021 | 11:19 AM
Share

मुंबई : नवीन आर्थिक वर्ष 2021-22 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. एप्रिल 2021 मध्ये भारतातील खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 15 दिवस बंद राहतील. विविध बँकांच्या सुट्टीमुळे 9 दिवस बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणून, आम्ही एप्रिल 2021 मध्ये शनिवार आणि रविवारी जोडल्यास एकूण 15 दिवस बँका बंद असतील. (bank holidays in april 2021 check the full list her)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) वेबसाइटनुसार, एप्रिल 2021 मध्ये बँक सुट्टीमध्ये राम नवमी (Ram Navmi), गुड फ्रायडे, बिहू, बाबू जगजीवन राम यांचा वाढदिवस आणि बरेच काही सणांचा समावेश आहे. तसेच तामिळ नवीन वर्ष आहे. बँकेचा पहिला कार्य दिवस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 3 एप्रिल रोजी असेल. म्हणजेच 1 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी बँकांमध्ये काम होणार नाही.

बँका का बंद राहणार?

महिन्यातील चौथा शनिवार आणि होळीच्या सणासाठी 27 मार्च ते 29 मार्च या काळात सार्वजनिक आणि खासगी बँका बंद आहेत. त्यानंतर 31 मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद असेल. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी 30 मार्च आणि 3 एप्रिल हे फक्त दोन दिवस उपलब्ध असतील. मात्र, इयर एडिंगच्या वर्क लोडमुळे या दोन दिवसांमध्येही बँकांमध्ये कितपत कामकाज होईल, याबाबत शंका आहे.

बँका कधी बंद आणि कधी सुरु राहणार?

29 मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

30 मार्च – यादिवशी बँका सुरु राहतील, पण पाटण्यातील बँक व्यवहार बंदच राहतील.

31 मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.

1 एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.

2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील.

3 एप्रिल – यादिवशी बँका सुरु राहतील.

4 एप्रिल – बँकांना रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल. (bank holidays in april 2021 check the full list her)

संबंधित बातम्या – 

फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Pulsar, Passion आणि Hero Karizma, वाचा काय आहे ऑफर

Pm Awas : 31 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा घर, केंद्र सरकार देत आहे थेट 2.67 लाखांची सूट

HDFC बँकेचं धमाकेदार होळी गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत मिळणार खास सुविधा

(bank holidays in april 2021 check the full list her)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.