HDFC बँकेचं धमाकेदार होळी गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत मिळणार खास सुविधा

सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना बँक या खास एफडीवर व्याज देते. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात घसरलेल्या व्याजदरात ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी ऑफर 18 मे 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती.

HDFC बँकेचं धमाकेदार होळी गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत मिळणार खास सुविधा
एचडीएफसी बँक
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 8:43 AM

नवी दिल्ली : होळीच्या निमित्ताने एचडीएफसी बँक (HDFC Bank) खासगी क्षेत्रातील ज्येष्ठांना एक मोठी भेट दिली आहे. एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष निश्चित ठेव योजना (special Fixed Deposit Scheme) तिसऱ्यांदा वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक सीनियर सिटिझन केअर एफडी स्कीम (Senior Citizen Care FD scheme) नावाची एक विशेष फिक्स्ड (एफडी) योजना ऑफर करते. सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना बँक या खास एफडीवर व्याज देते. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात घसरलेल्या व्याजदरात ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी ऑफर 18 मे 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती. (hdfc bank holi gift special fixed deposit scheme for senior citizens extended 30 june 2021)

खरतर, एसबीआयने सगळ्यात आधी विशेष निश्चित ठेव योजना वाढवली. बँकेने एसबीआय वेअर डिपॉझिट योजना तीन महिन्यांसाठी 30 जून पर्यंत वाढविली आहे.

किती मिळेल अधिक व्याज ?

एचडीएफसी बँक या ठेवींवर 75 बेसिस पॉईंट्स (bps) व्याज देत आहे. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के असेल. हे दर 13 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहेत.

HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, 18 मे ते 30 जून या कालावधीत विशेष ठेवींच्या ऑफर दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के (सध्याच्या 0.50 टक्के प्रिमियमपेक्षा जास्त) अतिरिक्त प्रीमियम देण्यात येईल. याअंतर्गत मुदत ठेवी एका दिवसापासून 10 वर्षांपर्यंत 5 कोटीपेक्षा कमी आणि 5 वर्षांची असणे आवश्यक आहे.

मुदत ठेव व्याज दर

एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50% व्याज आणि 30-90 दिवसांच्या मुदतीत जमा असलेल्या ठेवींवर 3% व्याज देते. 91 दिवस ते 6 महिन्यांच्या ठेवींवरील व्याज दर 3.5 टक्के आणि एक महिना व 6 महिन्यांपेक्षा कमी ठेवींसाठी व्याज दर 4.4 टक्के आहे.

एफडी मॅच्युरिटीवर एका वर्षात बँक 4.9 टक्के व्याज देते. एक वर्ष आणि दोन वर्षात परिपक्व एफडी व्याज दर 4.9 टक्के आहे. 2 वर्ष ते 3 वर्ष या कालावधीत एफडीवर 5.15 टक्के व्याज आणि 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याज 5.30 टक्के आहे. मुदतपूर्व कालावधी 10 ते दहा वर्षे असेल तर ठेवींवर 5.50 टक्के व्याज दिले जाईल. (hdfc bank holi gift special fixed deposit scheme for senior citizens extended 30 june 2021)

संबंधित बातम्या – 

सरकारसोबत पैसे कमावण्याची मोठी संधी! मोफत रजिस्ट्रेशन आणि बक्कळ कमाई

Petrol Diesel Price Today : होळीच्या दिवशी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे भाव? वाचा तुमच्या शहरातील दर

SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना मोठं Holi गिफ्ट, FD वर दिली धमाकेदार सुविधा

(hdfc bank holi gift special fixed deposit scheme for senior citizens extended 30 june 2021)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.