AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच, जाणून घ्या PF चा नियम

PF Interest After Retirement: केंद्रीय कर्मचारी भविष्य निधीतील (EPF) नियमानुसार, निवृत्तिनंतरही काही काळ PF खात्यातील जमा रक्कमेवर व्याज मिळत राहते. पण ही सुविधा सर्वांनाच मिळते असे नाही. तुम्ही कोणत्या वेळी नोकरी सोडली त्यावर हे सर्व अवलंबून आहे. काय आहे PF चा नियम?

EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच, जाणून घ्या PF चा नियम
नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच
| Updated on: Jul 26, 2026 | 3:36 PM
Share

PF Interest After Retirement: निवृत्त कर्मचार्‍यांच्या फायद्याची बातमी आहे. ज्यांनी भविष्य निधीतील (EPF) पैसा काढलेला नाही. EPFO च्या नियमानुसार, निवृत्तीनंतर (PF Interest After Retirement) काही काळासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कमेवर व्याज देतात. पण ही सुविधा नेहमीसाठी मिळत नाही. अखेरपर्यंत व्याजाची रक्कम मिळत नाही. तुम्ही कोणत्या वर्षी नोकरी सोडली वा कधी निवृत्ती स्वीकारली. त्यावर व्याजाची रक्कम मिळते. त्यासाठी PF चा नियम समजून घेणे आवश्यक आहे.

EPF आणि EPS मध्ये काय अंतर?

अनेक कर्मचारी EPF आणि EPS ही एकच योजना असल्याचे मानतात. पण या दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत. EPF एक बचत योजना आहे. तर EPS ही पेन्शन योजना आहे. जर कर्मचाऱ्याने EPS अंतर्गत कमीत कमी 10 वर्षांची सेवा पूर्ण केली तर ती व्यक्ती 50 व्या वर्षी किमान पेन्शन, निवृ्त्ती वेतन प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतो. 58 व्या वर्षी त्याला पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होते. जर कर्मचाऱ्याने 60 व्या वर्षापर्यंत पेन्शन घेण्यास उशीर केला तर तो जास्तीत जास्त पेन्शन मिळण्यास पात्र ठरतो.

केव्हा PF काढणे अगदी योग्य?

EPFO नियमानुसार निवृत्तीनंतर लागलीच PF काढणे योग्य नाही. जर तुम्हाला तात्काळ पैशांची गरज नसेल तर ही रक्कम काही काळ खात्यात राहू द्या. त्यावर कर्मचाऱ्याला अतिरिक्त व्याजाचा लाभ (PF Interest After Retirement) मिळतो. पण जर खाते निष्क्रिय झाले तर पीएफवरील व्याज मिळत नाही. कर्मचाऱ्याने त्याचे वय, आर्थिक गरज आणि भविष्यातील योजना याविषयी योग्य तो निर्णय घेऊन PF खात्यातून रक्कम काढणे फायदेशीर ठरते.

ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पीएफ अडकणार?

युनिफाईड मेंबर पोर्टलवर(UAN) सदस्यांना प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागणार आहे. प्रोफाईल फोटो हा सदस्याचा डिजिटल रेकॉर्डचा भाग आहे. प्रोफाईल फोटो अपलोड न केल्यास पीएफ अडकण्याची शक्यता आहे. सर्व EPFO ​​व्यवहारांसाठी प्रोफाईल फोटो अपलोड करण्याची गरज नाही. पण ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा फोटो अपलोड केलेला नाही. त्यांना e-नॉमिनेशन पूर्ण करण्यापासून ते ईपीएफओच्या इतर सेवांचा फायदा घेण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी ईपीएफओने एक अलर्ट दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर पीएफ काढताना अडचण येणार नसल्याचे समोर आले आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार