AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO ने जमा केले 8.25% व्याज, खात्यात पैसा आला की नाही? बॅलेन्स कसे तपासणार?

EPFO Interest Rate: ईपीएफओने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पीएफ व्याजाची रक्कम 7 कोटींहून अधिक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 15 जुलैपर्यंत अनेक खात्यात ही रक्कम जमा झाली. तुमच्या खात्यात व्याजाचा पैसा आला की नाही? असे तपासा?

EPFO ने जमा केले 8.25% व्याज, खात्यात पैसा आला की नाही? बॅलेन्स कसे तपासणार?
EPFO ने जमा केले 8.25% व्याज
| Updated on: Jul 16, 2026 | 3:12 PM
Share

EPFO Balance Check: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कोट्यवधी सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 15 जुलैपर्यंत देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने व्याजाची रक्कम जुलैच्या महिन्यात जमा होणार आहे. यापूर्वी ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्यासाठी अनेक आठवडे आणि महिने लागत होते. यापूर्वी सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू असायची. पण यावेळी नवीन डिजिटल सिस्टिम आणि तांत्रिक बाजू मजबूत झाल्याने जुलै महिन्यातच व्याजाची रक्कम खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नवीन तंत्रज्ञानामुळे प्रक्रियेला वेग

ईपीएफओने गेल्या काही वर्षात त्यांची सिस्टिम पूर्णपणे आधुनिक करण्याचे काम केले आहे. पूर्वी देशभरात 123 कार्यालयात वेगवेगळा डेटाबेस होता. व्याजाची मोजणी आणि रेकॉर्ड तपासण्यासाठी वेळ लागत होता. यामुळे प्रक्रियेला अनेक दिवस लागत होते. आता या सर्व रेकॉर्डमध्ये एक केंद्रीय डिजिटल डेटाबेस जोडण्यात आले आहे. या दरम्यान कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड सुरक्षितपणे नवीन प्रणालीत हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्याआधारे आता व्याजाची रक्कम झटपट खात्यात जमा होत आहे.

सदस्यांची माहिती, त्यांच्या खात्याचा पडताळा करण्यात आला. ही सर्व माहिती जुळल्यानंतर संबंधित ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ईपीएफओने गेल्या काही दिवसात त्यांचे नवीन डिजिटल पोर्टलही सुरू केले आहे. यामुळे अनेक प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत.

असे तपासा तुमचे पीएफ बॅलन्स?

UMANG ॲप, EPFO Member e-Sewa पोर्टल, मिस्ड कॉल अथवा SMS द्वारे तुम्ही खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली की नाही हे तपासू शकता. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम दिसेल. याशिवाय EPFO Member Passbook Portal वर Passbook Lite सेवेद्वारे सुद्धा खात्याची माहिती आणि व्याज जमा झाल्याची माहिती मिळेल.

एसएमएस सेवेद्वारे EPFO बॅलन्स असा तपासा?

EPFO सदस्य, ज्यांचे UAN सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक एसएमएसद्वारे (SMS) मिळवता येईल. 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” या मजकुरासह एसएमएस पाठवायचा आहे. तुमच्या भाषेतील पहिली तीन अक्षरांद्वारे दर्शविली जातात. ( उदा. ‘ENG’) तुम्हाला एसएमएस मराठीमध्ये मिळवायचा असल्यास ‘MAR’, बंगालीसाठी ‘BEN’, हिंदीसाठी ‘HIN’ असे पर्याय आहेत.

मिस्ड कॉल सेवेद्वारे असा तपासा बॅलेन्स?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अथवा EPFO सदस्य 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून कॉल करावा लागेल. UAN पोर्टलवर नोंदणी असल्यास तुम्हाला तपशील मिळेल.

Follow Us
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?