EPFO Subscribers : सप्टेंबरमध्ये 15.41 लाख सदस्य EPFO ​​मध्ये सामील, 9 लाख नवे सदस्य

वार्षिक आधारावर सप्टेंबर महिन्यात 3 टक्के वाढ झाली, तर मासिक आधारावर ती ऑगस्ट 2021 पेक्षा फक्त 0.18 दशलक्ष अधिक आहे. वयाच्या आधारावर तुलना केल्यास वेतनश्रेणी डेटानुसार 22-25 वर्षे वयोगटातील सर्वात जास्त सदस्य आहेत. या वयातील ग्राहकांची संख्या 4.12 लाख आहे. यानंतर 18-21 वर्षे वयोगटातील ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे.

EPFO Subscribers : सप्टेंबरमध्ये 15.41 लाख सदस्य EPFO ​​मध्ये सामील, 9 लाख नवे सदस्य

नवी दिल्लीः EPFO subscribers in September: सप्टेंबर महिन्यात 15.41 लाख सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये सामील झालेत, अशी माहिती EPFO ​​ने दिलीय. ही आकडेवारी देशातील संघटित क्षेत्रातील रोजगाराची स्थिती दर्शवते. यापैकी 8.95 लाख नवीन सदस्य आहेत, तर 6.46 लाख सदस्य EPFO ​​मध्ये पुन्हा सामील झालेत. नोकरीतील बदलामुळे हा प्रकार घडलाय.

तर मासिक आधारावर ती ऑगस्ट 2021 पेक्षा फक्त 0.18 दशलक्ष अधिक

वार्षिक आधारावर सप्टेंबर महिन्यात 3 टक्के वाढ झाली, तर मासिक आधारावर ती ऑगस्ट 2021 पेक्षा फक्त 0.18 दशलक्ष अधिक आहे. वयाच्या आधारावर तुलना केल्यास वेतनश्रेणी डेटानुसार 22-25 वर्षे वयोगटातील सर्वात जास्त सदस्य आहेत. या वयातील ग्राहकांची संख्या 4.12 लाख आहे. यानंतर 18-21 वर्षे वयोगटातील ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. या वयोगटात 3.18 लाख नवीन सदस्य जोडले गेले. बहुतेक सदस्य पहिल्यांदाच नोकरीत सामील झालेत. सप्टेंबर महिन्यात या दोन वयोगटातील ग्राहकांचे योगदान 47.39 टक्के आहे.

महाराष्ट्र, हरियाणामध्ये सर्वाधिक रोजगार

राज्यांच्या योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात. या राज्यांशी एकूण 9.41 लाख ग्राहक जोडलेले आहेत. हे एकूण वेतनाच्या सुमारे 61 टक्के आहे. लिंगभावाबद्दल बोलायचे झाले तर महिला ग्राहकांची संख्या 3.2 लाख आहे. ऑगस्टच्या तुलनेत ही संख्या 60 हजारांनी अधिक आहे. ऑगस्टमध्ये एकूण 2.6 लाख नवीन महिला ग्राहक जोडले गेलेत.

तज्ज्ञ सेवा श्रेणीमध्ये सर्वाधिक रोजगार

इंडस्ट्री डेटाबद्दल बोलायचे झाल्यास एक्सपर्ट सर्व्हिसेस कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सदस्य आहेत. मनुष्यबळ एजन्सी, खासगी सुरक्षा एजन्सी आणि छोटे कंत्राटदार तज्ज्ञांच्या सेवेत येतात, त्यांचे योगदान 41.22 टक्के आहे. याशिवाय इमारत बांधकाम, वस्त्रोद्योग, वस्त्रनिर्मिती, रुग्णालय आणि वित्त क्षेत्रातही वेतनवाढ होत आहे. EPFO च्या ग्राहकांची संख्या 60 दशलक्षाहून अधिक आहे. त्याचा एकूण निधी 12 लाख कोटींहून अधिक आहे.

संबंधित बातम्या

रिलायन्सकडून तेल व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय, जाणून घ्या कारण

पुढील वर्षी विम्याचा हप्ता 40 टक्क्यांनी वाढणार, कारण काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI