AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Update : नोकरदारांचे टेन्शन मिटलं! आता UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे, EPFO ही सुविधा माहिती आहे का? वाचा केव्हा सुरू होणार? कसं काम करणार?

PFO लवकरच UPI द्वारे PF चे पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या सुविधेमुळे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

EPFO Update : नोकरदारांचे टेन्शन मिटलं!  आता UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे, EPFO ही सुविधा माहिती आहे का? वाचा केव्हा सुरू होणार?  कसं काम करणार?
UPI PAYMENT FOR EPFOImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 2:57 PM
Share

नोकरदार वर्गासाठी PF चे पैसे आधाराची काठी. आयुष्यभर नोकरी करून हातात येणारी कष्टाची मेहनतीची साठवणूक. प्रत्येक सामान्य माणूसाने हे पैसे आपल्या भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा गरजेच्या वेळी वापरायचे असे ठरवलेले असते. पण बऱ्याचदा अस होतं की जी रक्कम गरजेच्या वेळीसाठी ठेवलेली असते, ती वेळेत मिळतच नाही. PF चे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर रक्कम बँक खात्यात जमा होईपर्यंत वाट बघावी लागते. सामान्यांचे हेच होणारे हाल लक्षात घेऊन लवकरच EPFO UPI व्दारे पीएफचे पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

UPI ने पीएफचे पैसे कसे काढायचेय़?

सध्या पीएफमधील पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना UNN पोर्टलवर जाऊन ऑनलाईन दावा दाखल करावा लागतो. त्यानंतर EPFO कडून या दाव्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ती रक्कम बँक खात्यात पाठवली जाते. यासाठी प्रचंड वेळ वाया जातो.

हाच वेळ कमी करण्यासाठी EPFO यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यावर काम करत आहे. यासाठी UNN PORTALपीएफ धारकांच्या यूपीआय खात्यांशी जोडण्याची तयारी सुरू आहे. तसेत यासाठी नवीन मोबाईल अॅप सुरू करण्याचा विचारही केला जात आहे. हे यूपीआय पेमेंट करताना यात भीम, फोनपे आणि गुगल पे यांसारख्या यूपीआय अॅप्सचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

UPI ने फक्त इतकेच पैसे काढता येणार

मिळालेल्या माहितीनुसार EPFO ने यूपीआयची सुविधा जरी सुरू केली असली तरी या सुविधेचा वापर करून केवळ काही प्रमाणातच पैसे काढता येणार आहेत. UPI सुविधेचा वापर करताना केवळ 75% टक्के रक्कमच काढता येणार आहे. उर्वरित 25 टक्के रक्कम खात्यात ठेवणे अनिवार्य असेल. त्यामुळे पीएफ खात्यात जमा असलेली सगळी रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही.

सुविधा कधी सुरू होणार?

सध्या यूपीआयद्वारे पीएफची रक्कम काढण्याच्या सुविधेवर काम सुरू असून, ही व्यवस्था चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे.डिसेंबर 2026 च्या शेवटपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र. पैसे काढण्यासाठी कोणत्या अटी आणि पात्रतेचे निकष लागू असतील. याची सविस्तर माहिती सुविधा झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात