EPFO चे पुढचे पाऊल, आता आर्थिक तंगी होणार दूर, कर्मचाऱ्यांना दुप्पट पैसा काढता येणार

कर्मचारी भविष्य निधी संघटनाने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आणली आहे. सध्या संघटनेकडे 27 कोटींहून अधिक सदस्य आहेत. कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. आता यासंबंधीचा एक नियम पीएफ खात्याने बदलविला आहे. त्यामुळे सदस्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागणार नाहीत.

EPFO चे पुढचे पाऊल, आता आर्थिक तंगी होणार दूर, कर्मचाऱ्यांना दुप्पट पैसा काढता येणार
ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना मोठा आधार
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 11:59 AM

कर्मचारी भविष्य निधी संघटना, EPFO ने पीएफ खातेदारांच्या डोक्यावरील एक मोठी चिंता दूर केली आहे. पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. पेन्शन फंड बॉडीने खातेदारांना उपचारांसाठी रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आतापर्यंत खातेदारांना, कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांची रक्कम काढता येत होती. आता कर्मचारी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.

16 एप्रिलपासून नवीन नियम लागू

ईपीएफओने उपचारांसाठी पैसा काढण्याचा नियम बदलवला आहे. बुधवारी 16 एप्रिल 2024 रोजी हे नियम लागू करण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार, हा बदल लागू करण्यासाठी संघटनेने 10 एप्रिल रोजीच त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये संबंधित आवश्यक बदल केला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता एक लाखांपर्यंतची रक्कम काढता येईल. कर्मचाऱ्यांना नियम 68J अंतर्गत पीएफ खात्यातून रक्कम काढता येते.

हे सुद्धा वाचा

गंभीर आजारात मोठी आर्थिक मदत

ईपीएफओने सेंट्रल प्रोव्हिडंट फंड कमिशनरकडून मान्यता मिळताच, हा बदल करण्यात आला. PF Account Holder ला गंभीर आजारात वा अत्यंत कठिण काळात मोठ्या रक्कमेची आवश्यकता असताना पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची सुविधा मिळते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कर्मचारी अग्रिम रक्कमेसाठी अर्ज करु शकतो. त्याला 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम काढता येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मदतीसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाही अथवा कर्ज काढण्याची वेळ येणार नाही.

कशी काढता येईल रक्कम

  1. ईपीएफओचे संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर लॉगिन करा
  2. त्यानंतर Online Services हा पर्याय निवडा. संबंधित क्लेम फॉर्म भरा
  3. आता PF Account चे शेवटचे 4 क्रमांक टाका, पडताळणी करा
  4. Proceed For Online Claim वर क्लिक कर आणि फॉर्म 31 भरा
  5. तुमच्या खात्याची सविस्तर माहिती तपासा, पासबुकची सॉफ्ट कॉपी अपलोड करा
  6. आता Get Aadhaar OTP वर क्लिक करा. तो अर्जात भरा आणि सबमिट करा

1 एप्रिलपासून नियमात हा बदल

या 1 एप्रिलपासून ईपीएफओने कर्मचाऱ्यांना मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. PF ट्रान्सफर करण्याची झंझट संपली आहे. कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर त्याचा पीएफ दुसऱ्या कंपनीसोबत विलीन (Merger) करण्याची प्रक्रिया वेळू खाऊ आणि मनस्ताप देणारी होती. नवीन नियमाने ही झंझटच संपवली. पीएफ हस्तांतरीत करण्यासाठी कर्मचाऱ्याला फॉर्म क्रमांक 31 भरण्याची गरज नाही. कर्मचाऱ्याने नोकरी बदलताच पीएफ आपोआप हस्तांतरीत, विलीन होणार आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.