Penny Stock : 18 रुपयांच्या छोटुराम शेअरची कमाल, 20% अप्पर सर्किट, इतर गुंतवणूकदारांना संधी मिळणार?
Stock Market : शेअर बाजारत कधी कधी बड्या कंपन्यांना जे साध्य होत नाही, ते छोट्या कंपन्या अगदी काही दिवसात करतात. त्यांच्या करिष्माई कामगिरीने अनेक गुंतवणूकदार अचंबित होतात. तर या शेअरने अशीच कमाल केली आहे.

शेअर बाजारात अनेक छोट्या कंपन्यांचे शेअर कमाल दाखवतात. काही कंपन्यांचे फंडामेंटल मजबूत असते. त्यांच्यावर कर्जही नसते. असे छोटुराम बाजारात आग लावतात. त्यांच्यावर मग गुंतवणूकदारांच्या उड्या पडतात. स्टॉक ब्रोकरेज फर्म BSE-NSE वर या शेअर्सला अप्पर सर्किट लागते. मग अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरते. कमाई करून बाहेर पडण्याची संधी हातातून जाते. अशाच एका छोट्या शेअरची सध्या चर्चा सुरू आहे. या स्टॉकचे नाव युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स (Eurotex Industries & Exports) असे आहे. 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा शेअर तुफान पळाला.
शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्सचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडला. हा शेअर 20 टक्के पळाला. 29 ऑक्टोबर रोजी युरोटेक्स इंडस्ट्रीज आणि एक्सपोर्ट्सचा शेअर NSE वर 15.60 रुपयांवर बंद झाला. तर काल तो 18.72 रुपयांवर पोहचला. आज शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी या शेअरने 22.46 रुपयांवर झेप घेतली. या शेअरने लांब पल्ला गाठला. बीएसईवर सुद्धा या शेअरने कमाल दाखवली. हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार डोळे लावून आहेत. ते अप्पर सर्किट कधी निघते याची वाट पाहत आहेत.
आज या कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर 23.44 रुपयांवर पोहचला. सुरुवातीलाच हा शेअर 6.91 टक्क्याने उसळला. गेल्या तीन दिवसापासून सातत्याने हा शेअर वधारला आहे. या काळात या शेअरने 67.31 टक्क्यांची उसळी नोंदवली. ट्रेंड पाहता हा शेअर सातत्याने वरच्या दिशेने धाव घेत असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा बळावल्या आहेत. हा शेअर खरेदी करता यावा यासाठी गुंतवणूकदार प्रयत्न करत आहेत. हा शेअर धावण्याची कारणं अद्याप समोर आले नाहीत.
युरोटेक्स इंडस्ट्रीज काय करते?
युरोटेक्स इंडस्ट्रीझ आणि एक्सपोर्ट्स ही कंपनी कॉटन आणि नेटेड फॅब्रिक तयार करते आणि त्याची परदेशात निर्यात करते. ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातही आहे. ही कंपनी अनेक कॉम्बेडटन यार्न तयार करते. तर इतर क्षेत्रातही ही कंपनी नशीब आजमावत आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
