EV Share | इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी कंपनी ठरणार वरदान, गुंतवणूकीचा चुकवू नका चान्स

EV Share | या कंपनीने मोठा परतावा दिला आहे. हा स्टॉक मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअरने गेल्या सहा महिन्यात 187 टक्के परतावा दिला आहे. तर एका वर्षात या कंपनीने 306 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. आता ही कंपनी देशात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी एक हजार चार्जिंग स्टेशन बसवणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

EV Share | इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी कंपनी ठरणार वरदान, गुंतवणूकीचा चुकवू नका चान्स
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 5:57 PM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक सध्या जोरदार कामगिरी बजावत आहेत. काहींनी मोठी योजना आखली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. बाजार आता इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी पुढाकार घेत आहे. इतर पण पर्याय समोर येत आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची एकच चर्चा रंगली आहे. काही कंपन्या वाहन उत्पादनात उतरल्या आहेत. तर काही कंपन्यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनकडे मोर्चा वळवला आहे. ही कंपनी देशात लवकरच एक हजार चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. गेल्या सहा महिन्यात परतावा देण्यात पण या शेअरने आघाडी घेतली आहे. भविष्यासाठी हा शेअर लंबी रेस का घोडा ठरु शकतो.

उभारणार चार्जिंग स्टेशन

सर्वोटेक पॉवर सिस्टम्स (Servotech Power Systems) ही ती कंपनी आहे. ही कंपनी लवकरच देशात एक हजार चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने बाजारातील लोकप्रिय EMCOR Power Solutions सोबत करार केला आहे. ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. इमकॉर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुवेतची कंपनी आहे. तिचे भारतात त्याचे नावाने युनिट आहे. त्यामुळे या कंपनीच्या व्यवसायात मोठी वृद्धी होण्याची शक्यता आहे. भविष्यात या कंपनीचा पसारा वाढू शकतो. महसूल वाढ शकतो. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

स्टॉक स्प्लिटची ऑफर

या कंपनीने 28 जुलै 2023 रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिट केला. या कंपनीची कामगिरी जोरदार आहे. या कंपनीचा महसूल 148.34 टक्क्यांनी वधारला. 79.57 कोटी रुपयांवर महसूल पोहचला आहे. कंपनीचा या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 4.10 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. कंपनीचा शेअर शुक्रवारी 1.35 टक्क्यांनी वधारुन 74.90 रुपयांवर पोहचला. एका वर्षात या कंपनीने 306 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तर सहा महिन्यात कंपनीने 187 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तीन वर्षांत कंपनीने 2,890 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.