Stock Spilt | एका शेअरचे होतील 5 तुकडे! गुंतवणूकदारांना मिळतील असे फायदे

Stock Spilt | गेल्या एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरने जोरदार कामगिरी केली आहे. या शेअरमध्ये तेजीचे सत्र आले आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. आता कंपनी शेअर स्प्लिट करणार आहे. एका शेअरचे 5 तुकडे करण्यात येईल. त्याची रेकॉर्ड डेट निश्चीत करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Stock Spilt | एका शेअरचे होतील 5 तुकडे! गुंतवणूकदारांना मिळतील असे फायदे
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 10:05 AM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : गेल्या एका वर्षात काही कंपन्यांनी मोठी घौडदौड केली आहे. बाजारात तेजी मंदीचे सत्र सुरु असतानाही या कंपन्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला नाही. ऑर्डर मिळाल्याने या कंपन्यांचे काम वाढले. त्यांचा महसूल आणि नफा वाढला. गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला. या कंपनीने पण गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ दिला नाही. या कंपनीचा शेअर एका वर्षात 500 टक्क्यांनी वधारला आहे. आता कंपनीने एका शेअरचे 5 तुकडे (Share Split) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. त्यामुळे हा शेअर खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कंपनीची कामगिरी जोरदार असल्याने गुंतवणूकदारांचे या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

कधी आहे रेकॉर्ड डेट

तर Geekay Wires ने हा करिष्मा केला आहे. शेअर बाजाराला कंपनीने शेअर स्प्लिटची माहिती दिली आहे. 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या एका शेअरला 5 तुकड्यात वाटण्यात येईल. या कंपनीचे फेस व्हॅल्यून कमी होऊन 2 रुपये होईल. कंपनीने या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 23 ऑक्टोबर 2023 ही निश्चित केली आहे. गेल्या महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

घोषणेनंतर शेअरला अप्पर सर्किट

गुरुवारी कंपनीच्या शेअरला सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट लागले आहे. त्यानंतर एका शेअरची किंमती 362.70 रुपयांच्या स्तरावर पोहचली. सलग तीन दिवसांच्या व्यावसायिक सत्रात कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. गेल्या 6 महिन्यात Geekay Wires च्या शेअरची किंमती 102 टक्क्यांनी वधारली आहे. हा शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अशी आहे कामगिरी

कंपनीने या आर्थिक वर्षात आतापर्यंत 101.30 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षांत हा आकडा 88.22 कोटी रुपये होता. जून 2023 पर्यंत कंपनीला 8.32 कोटी रुपयांचा नफा झाला. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 2.58 कोटींचा फायदा झाला होता. गीक वायर्सने 52 आठवड्यात 362.70 रुपयांचा उच्चांक गाठला होता. या 12 ऑक्टोबर रोजी हा रेकॉर्ड झाला. तर कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांक 54.70 रुपये होता. गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी ही निच्चांकी कामगिरी केली होती. गेल्या पाच वर्षांत या मल्टिबॅगर शेअरने 867.20 टक्के परतावा दिला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.