AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकूनही स्कॅन करू नका ‘हे’ क्यूआर कोड, अन्यथा बँक खाते होईल रिकामी!

क्यूआर कोड म्हणजे quick response code हा इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात जलद गतीने काम करण्याचा एक सोपा मार्ग आहे.

चुकूनही स्कॅन करू नका 'हे' क्यूआर कोड, अन्यथा बँक खाते होईल रिकामी!
क्यूआर कोड म्हणजे quick response code हा इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात जलद गतीने काम करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
| Updated on: Jan 29, 2021 | 5:54 PM
Share

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वसामान्य नागरिकांना अज्ञात स्रोतावर किंवा फोनवर आलेला क्यूआर कोड स्कॅन करु नका, असा इशारा दिला आहे. असे क्यूआर कोड स्कॅन केल्यास फसवणूक होऊन आपल्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले जाऊ शकतात. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने ‘सायबर दोस्त’ने लोकांना चेतावणी देताना हे ट्विट केले आहे. सायबर क्षेत्रात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘सायबर दोस्त’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यात आहे (Fake QR code alert by cyber dost).

क्यूआर कोड म्हणजे quick response code हा इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात जलद गतीने काम करण्याचा एक सोपा मार्ग आहे. हा कोड चिन्हांच्या स्वरूपात असतो, जो आपण स्वतः वाचू शकत नाही. हे वाचण्यासाठी एक विशेष डिव्हाईस आवश्यक आहे किंवा तो कोड डिव्हाईसमध्ये स्थापित स्कॅनरच्या मदतीने वाचला जाऊ शकतो. हा मॅट्रिक्स बारकोडचा एक प्रकार आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची माहिती असते. क्यूआर कोड आधी ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये दाखल झाला होता, परंतु आज त्याची व्याप्ती विस्तृत आहे. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही, की जेथे त्याचा उपयोग होत नाही. मात्र, त्याच्या अत्यधिक वापरामुळे फसवणूकीच्या घटनांमध्येही कमालीची वाढ झाली आहे.

क्यूआर कोड समजण्यासाठी आधारचे उदाहरण घेता येईल. आजकाल, आधारवर एक नवीन सुरक्षित क्यूआर कोड दिसून येतो. त्यात आधार कार्ड धारकाच्या फोटो आणि डेमोग्राफिक्स बद्दल संपूर्ण माहिती आहे. आधारशी संबंधित QR कोड टेंपर-प्रूफ आहे. कारण त्याला यूआयडीएआय द्वारे डिजिटल मान्यता मिळाली आहे.

आधारचा क्यूआर कोड

आधारच्या क्यूआर कोडमध्ये संदर्भ कोड, कार्ड धारकाचे नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, घराचा पत्ता, छायाचित्र आणि 2048 बिट डिजिटल स्वाक्षरी समाविष्ट आहे. हा क्यूआर कोड हँडहेल्ड स्कॅनर डिव्हाईस, अँड्रॉइड आधारित अॅप आणि आयओएस आधारित अॅपमधून स्कॅन केला जाऊ शकतो. याशिवाय आपल्या दररोज प्रत्येक उत्पादनावर देखील क्यूआर कोड असतो, त्यातून त्या उत्पादनाविषयी सर्व माहिती मिळू शकते. क्यूआर कोड मोबाईल पेमेंट्स ऑफ पॉईंट ऑफ सेल (पीओएस) साठी देखील वापरले जातात. त्याचा वापर कोरोना कालावधीत झपाट्याने वाढला आहे. दुधाची खरेदी करण्यापासून रेशनिंगपर्यंत आणि ऑटोचे भाडे देण्यापर्यंत लोक क्यूआर कोड स्कॅन वापरत आहेत (Fake QR code alert by cyber dost).

मोबाईल वॉलेट पेमेंट

यासाठी मोबाईल वॉलेट किंवा बँकचे अ‍ॅप स्कॅनरची सुविधा देते. क्यूआर कोड स्कॅन होताच वॉलेट किंवा बँक अ‍ॅपमधून पैसे वजा केले जातात. हे आपल्याला रोखी रक्कम बाळगण्याच्या त्रासातून मुक्त करते. म्हणजेच आपला मोबाईल, बँक आणि रोख पैसे अशी दोन्ही प्रकारची काम करतो. परंतु प्रश्न असा आहे की, क्यूआर कोड स्कॅन करणे किती सुरक्षित आहे? सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने पुरविलेल्या सेवांमध्ये क्यूआर कोड वापरण्यात काहीच अडचण नाही, परंतु आजकाल फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. म्हणूनच, गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, अज्ञात क्यूआर कोड स्कॅन करू नये, अन्यथा आपले खाते पूर्णपणे रिकामे देखील केले जाऊ शकते.

क्यूआर कोडद्वारे फसवणूक

फसवणूक करणारे लोक मोबाईलवर मेसेजेसद्वारे क्यूआर कोड पाठवून किंवा आपल्या संगणकावर असे मेसेज पाठवून फसवणूक करतात. असे अज्ञात क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे बँक खात्यातील रक्कम गेल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. हे डिजिटल फसवणूकीचे एक नवीन रूप आहे. त्यामुळे सरकारने हे टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. क्यूआरबद्दल पूर्ण माहिती उपलब्ध होईपर्यंत पीओएस विश्वसनीय असंल्यासच पीओएस स्कॅन केले पाहिजेत, हे सरकारने स्पष्ट केले आहे. अन्यथा, बँक खाते रिकामे होण्याचा धोका वाढू शकतो.

(Fake QR code alert by cyber dost)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.